सखीमंच सदस्य नोंदणीस उद्यापासून होणार प्रारंभ
By Admin | Updated: February 15, 2015 00:50 IST2015-02-15T00:50:40+5:302015-02-15T00:50:40+5:30
लातूर : लोकमत संखी मंच सदस्य नोंदणीला १६ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे़ सदस्य नोंदणी करणाऱ्या सभासदाला वर्षभरात लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी संधी

सखीमंच सदस्य नोंदणीस उद्यापासून होणार प्रारंभ
लातूर : लोकमत संखी मंच सदस्य नोंदणीला १६ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे़ सदस्य नोंदणी करणाऱ्या सभासदाला वर्षभरात लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी संधी मिळवून देण्यात आली आहे़ शिवाय, ३५० रूपयांच्या नोंदणी शुल्कावर वर्षभरात ३ हजार रूपयांपर्यंतच्या सेवा मिळणार आहेत़
सखी मंच सदस्यांना वर्षभरात ज्ञान, स्पर्धा, मनोरंजन, खेळ, व्यक्तीमत्व विकास, याचा चौफेर मिलाफ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे़ नोंदणीवेळीच कडई सेट, सखी मंच ओळखपत्र, १ लाखाचा अपघात मृत्यू विमा, डायट बुक, श्री ज्वेलरी तर्फे मोबाईल पाऊच, राजभोग आटातर्फे अर्धा किलो आटा बॅग, हरिष स्टाईल स्टुडिओ तर्फे फॅमिली फोटो विथ फ्रेम, स्वर्णदीप जेम्स अॅन्ड ज्वेलरी तर्फे वाढदिवसानिमित्त बांगड्या आदी सेवा सुविधा सदस्यांना दिल्या जाणार आहेत़ तसेच राधिका ब्युटी पार्लर तर्फे ५०० रुपयांचे हेअरकट व क्लिनअप, हॉटेल गोल्ड अॅम्बेसी तर्फे २० टक्के डिस्काऊंट कुपन, हॉटेल क्रुज तर्फे ५०० रुपये बिलावर १० टक्के सुट, केजीएन हॉस्पिटलमध्ये तपासणीत ५० टक्के सुट, जीवनरेखा क्लिनिक तर्फे मोफत तपासणी, व्हीएलसीसी तर्फे ४५० रुपयाचा हेअरकट, द्वारकादास शामकुमार तर्फे १५०० च्या खरेदीवर १५० रुपयाचे कुपन, मनोजा एजन्सी तर्फे महेंद्रा टू व्हिलरवरच्या खरेदीवर ५०० रुपयाचे डिस्काऊंट, लिबर्टी स्टुडिओतर्फे पासपोर्ट फोटो, पुरुषोत्तम सुपरमार्केटमध्ये १ हजारच्या खरेदीवर १ किलो साखर, मोरेश्वर क्लिनीकमध्ये तपासणीत ५० टक्के सुट आदी सुविधा मिळणार आहेत़
लातूर लक्की ड्रॉच्या माध्यमातून ५ ग्राम गोल्ड रिंग, कपाट, ५ हजार रुपयाचे २५ कुपन, ८ साड्या, गॅस शेगडी, ८ यु अॅड आय सेट, आटा बॅग, २० जेवणाचे कुपन, वाटर प्युरीफायर, इन्डक्शन गॅस, बँगल सेट, ज्वेलरी सेट, हॉटपॉट, इलेक्ट्रॉनिक तिजोरी आदी पारितोषीकाची मांदियाळी आहे़ अधिक माहितीसाठी प्रतिक्षा राजेमाने -८६२४८६१३०९ व ओंकार धर्माधिकारी ९०९६३५९३९८ यांच्याशी संपर्क करावा़ (प्रतिनिधी)