बजाजनगरात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:25+5:302021-02-05T04:10:25+5:30

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अशोक पानकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश वाघ, वाल्मीक गायकवाड, बाबासाहेब शेळके यांची उपस्थिती होती. या ...

Meeting of teachers and non-teaching staff in Bajajnagar | बजाजनगरात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा

बजाजनगरात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अशोक पानकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश वाघ, वाल्मीक गायकवाड, बाबासाहेब शेळके यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात जुनी पेन्शन मंजुरीबाबत व जीपीएफ खाते सुरू करण्याबाबत सर्व तांत्रिक बाबींविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेले सर्व अनुदानित, विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना तत्काळ जुनी पेन्शन योजना मंजूर करावी यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय मेळावे घेण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगीता शिंदे या करणार असून, पुढील आठवड्यात ७ फेब्रुवारीला शहरातील चाटे हायस्कूल येथे जिल्हास्तरीय संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुकास्तरीय समिती निवड केली असून, या समितीत अशोक पानकडे, प्रकाश वाघ, एस. एन. जाधव, वाल्मीक गायकवाड, रामेश्वर शेळके, सी. के. जाधव, महेंद्र गोर्डे, एन. डी. मोहरे, व्ही. यु. चापे, वैभव ढेपे, विनोद म्हस्के, आदींचा समावेश करण्यात आला आहे. या मेळाव्याला दिनेश साळुंके, बाबासाहेब राबडे, अमोल शिंदे, शैलेंद्र रसाळ, भाऊसाहेब कोळी, चक्रधर डाके, ज्ञानेश्वर जंगले, विजय बारोटे, सुनील चौधरी, व्ही. एस. शिंपी, दारुंटे, हरकळ, बाळू काळे, आर. ए. जाधव, के. ए. कानडे, डी. आर. पवार, चंद्रशेखर जाधव, आदींची उपस्थिती होती.

---------------------------

Web Title: Meeting of teachers and non-teaching staff in Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.