शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात भरतनाट्यम नृत्यशैली रुजवणाऱ्या मीरा पाऊसकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 18:38 IST

मराठवाड्यात भरतनाट्यम नृत्यशैलीचे पहिले रोप मीरा पाऊसकर यांनी रुजवले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

ठळक मुद्दे१९७७ मध्ये त्यांनी निर्मलादेवी नृत्यझंकार नृत्यसंगीत अकादमी स्थापन केली. त्यांनी या अकादमीपासून नृत्यशिक्षिका म्हणून आपला नव्याने प्रवास सुरू केला.

औरंगाबाद : नृत्य शिरोमणी, गुरुवर्य मीरा पाऊसकर (७९) यांचे शुक्रवारी (दि.१४) पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर सायंकाळी प्रतापनगर समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठवाड्यात भरतनाट्यम नृत्यशैलीचे पहिले रोप मीरा पाऊसकर यांनी रुजवले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो मुली-मुले आज देश - विदेशात नृत्यकलेचा प्रचार- प्रसार करीत आहेत. मीरा पाऊसकर या धारवाड व हुबळी येथे महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. काही वर्षे प्राचार्य म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली. त्यांचे पती बाबूराव पाऊसकर हे बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते. त्यांची बदली औरंगाबादमध्ये झाली आणि पाऊसकर कुटुंब शहरात आले. मीरा पाऊसकर यांनी धारवाड येथे गुरू श्रीनिवास कुलकर्णी व उमेश हिरांजाल यांच्याकडे भारतनाट्यमचे शिक्षण पूर्ण केले होते. औरंगाबादेत त्यांनी भरतनाट्यम शिकविण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये त्यांनी निर्मलादेवी नृत्यझंकार नृत्यसंगीत अकादमी स्थापन केली. त्यांनी या अकादमीपासून नृत्यशिक्षिका म्हणून आपला नव्याने प्रवास सुरू केला.

भरतनाट्यमसोबतच त्यांनी कुचिपुडी नृत्यशैलीचे शिक्षण दिले. राजीव बालभवनची शाखा शहरात स्थापन केली. इतर कलाप्रकार व विज्ञानामध्ये चुणूक दाखविणाऱ्या मुला- मुलींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. भरतनाट्यमचे प्रशिक्षण देताना त्यांनी प्रयाग संगीत समिती अलाहाबाद, इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय खैरागढ, गांधर्व महाविद्यालय अशा विद्यापीठांशी संस्था संलग्न केली व येथील विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या १०० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी अरंगेत्रम सादर केले. भरतनाट्यमचा प्रसार-प्रचारात मोठे योगदान लक्षात घेऊन इंडियन डान्स अकादमीने त्यांना नृत्य शिरोमणी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. लायन्स क्लबने उत्कृष्ट शिक्षकाचा ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार प्रदान केला होता.

राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी गौरविलेमीरा पाऊसकर यांच्या विद्यार्थिनींना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, एच. डी. देवीगोडा यांच्या समोर भरतनाट्यमच्या सादरीकरणचा मान मिळाला. त्यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी मीरा पाऊसकर यांच्या भारतीय शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील योगदानचा गौरव केला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू