मीनाक्षी जैस्वाल यांचा जालन्याशी घनिष्ठ संबंध
By Admin | Updated: December 21, 2014 00:07 IST2014-12-20T23:48:12+5:302014-12-21T00:07:10+5:30
जालना : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मीनाक्षी जैस्वाल यांची मुंबई येथे हत्या झाली आहे. त्यांचा जालन्याशी घनिष्ट संबंध असून संगीतकार टिकारिया बंधू

मीनाक्षी जैस्वाल यांचा जालन्याशी घनिष्ठ संबंध
जालना : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मीनाक्षी जैस्वाल यांची मुंबई येथे हत्या झाली आहे. त्यांचा जालन्याशी घनिष्ट संबंध असून संगीतकार टिकारिया बंधू यांच्या भाऊजीच्या त्या धाकट्या भगिनी होत. शिवाय त्यांची नणंदही जालन्यात संजय जैस्वाल यांच्या कुटूंबात आहे.
मीनाक्षी जैस्वाल यांच्या हत्येच्या घटनेचा जालन्यात निषेध व्यक्त करण्यात आला. मराठवाडा जैस्वाल समाज जागृती मंचचे अध्यक्ष राधेशाम जैस्वाल यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध केला. हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. संजय टिकारिया व सिने संगीतकार शैलेंद्र-मनोज जैस्वाल यांच्या त्या भाऊजीच्या भगिनी तर माजी मुख्याध्यापक बी.एस. टिकारिया यांचे भाऊजी सुरेश चेटुपुडे यांच्या त्या भगिनी होत. शहरातील एका चित्रपटगृहाचे मालक संजय जैस्वाल यांच्या कुटूंबात मीनाक्षी जैस्वाल यांची नणंद कांचन जैस्वाल यांचे लग्न झालेले आहे. ४
राधेश्याम जायस्वाल यांनी सांगितले की, नातेसंबंधांमुळे मीनाक्षी जैस्वाल यांच्याशी जालन्यातील काही परिवारांशी घनिष्ठ संबंध होते. मीनाक्षी यांच्या हत्येचे वृत्त कळताच या परिवारातील सदस्यांना धक्का बसला. काहींनी या वृत्ताची खात्री करण्याासाठी मुंबई येथील नातेवाईकांशी दुरध्वनी संपर्क केला, असेही ते म्हणाले.