दात्यांकडून औषधींचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:47 IST2018-07-31T00:46:46+5:302018-07-31T00:47:25+5:30
रुग्णालय प्रशासनाने समाजातील दात्यांना औषधी दान करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत सोमवारी पुष्कर भातांब्रेकर यांनी मुलगा हर्ष याच्या दुसºया वाढदिवसानिमित्त ३ बॉक्स रिंगर लॅक्टेट आणि डीएनएसचे ३ बॉक्स रुग्णांसाठी दिले.

दात्यांकडून औषधींचे दान
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दात्यांकडून होणाऱ्या अन्नदानामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना फायदा कमी; पण घाटी रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. अन्नाची नासाडी होत असल्याने रुग्णालय प्रशासनाने समाजातील दात्यांना औषधी दान करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत सोमवारी पुष्कर भातांब्रेकर यांनी मुलगा हर्ष याच्या दुसºया वाढदिवसानिमित्त ३ बॉक्स रिंगर लॅक्टेट आणि डीएनएसचे ३ बॉक्स रुग्णांसाठी दिले. इतर दाते व संस्थांनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन घाटी रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
घाटीत संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश व विदर्भाच्या काही भागांतील रुग्ण उपचारार्थ येतात. त्यांच्या समवेत त्यांचे नातेवाईकही सोबत येत असतात. त्यांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने विविध स्वयंसेवी संस्था व संघटना अन्नदान करतात. मात्र, हे अन्नदान घाटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक अन्न न खाता ते कचºयात टाकत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातून कच-याची समस्या निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कच-याच्या डब्यात टाकल्याचे आढळून आले होते. अन्नाची नासाडी होऊ नये, तसेच अन्नदानावर होणाºया खर्चातून औषधी खरेदी करावी. गरजू आणि आर्थिक दुर्बल रुग्णांना ती पुरवावी. सलाईन, बँडेजसह इतर कमी खर्चाच्या औषधी रुग्णांना पुरविल्या जाऊ शकतात. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन घाटी रुग्णालय प्रशासनाने केले आहे.