वाळूपट्ट्यांचे मोजमाप

By Admin | Updated: June 24, 2014 00:05 IST2014-06-24T00:05:15+5:302014-06-24T00:05:15+5:30

तळणी: मंठा तालुक्यातील लिलाव झालेल्या सर्व वाळू पट्ट्यांचे मोजमाप क रण्यात आले. ही कारवाई मंठा तहसीलदार छाया पवार यांच्या पथकाने केली.

Measuring sands | वाळूपट्ट्यांचे मोजमाप

वाळूपट्ट्यांचे मोजमाप

तळणी: मंठा तालुक्यातील लिलाव झालेल्या सर्व वाळू पट्ट्यांचे मोजमाप क रण्यात आले. ही कारवाई मंठा तहसीलदार छाया पवार यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे वाळू ठेकेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पूर्णा नदीवरील लिलाव झालेल्या वाळू पट्ट्यातून शासन निर्देश डावलून संबंधित गुत्तेदार बेसुमार वाळू उपसा क रीत आहेत. एक ाच पावतीवर दिवसभर वाळूची वाहतूक करणे क्षमतेपेक्षा जात उपसा होत असल्याचा तक्र ारी महसूल विभागाक डे ग्रामस्थांनी के ला होत्या.
यातच पावसाळ्यात जादा दराने वाळू विक्र ी क रण्यासाठी अवैध उपसा क रु न साठा क रण्यासाठी वाळू माफि या सरसावले असल्याचा तक्र ारींची दखल घेऊ न मंठा तहसीलदार छाया पवार यांनी प्रत्यक्ष लिलाव झालेल्या देवठाणा - उस्वद, उस्वद - देवठाणा, कानडी, सासखेडा, इंचा, दुधा, वाघाळा व भुवन या वाळू पट्ट्यांचे मोजमाप केले आहे. तर उस्वद - देवठाणा, पूर्णा पाटी, सासखेडा, इंचा, दुधा, टाकळखोपा,वाघाळा, वझर सरकटे, कि र्ला व भुवन या ठिक ाणाहून पावसाळ्यात विक्री करण्यासाठी केलेले वाळू साठे जप्त करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठ्यांना देण्यात आले आहे. या क ारवाई अनेक वाळू पट्टे बंद होणार आहेत. साठेही जप्त होणार असल्याने माफियात खळबळ उडाली आहे.
या बाबत तहसीलदार छाया पवार म्हणाल्या, लिलाव झालेले सर्व वाळू पट्ट्यांचे मोजमाप करण्यात आले. साठ्यांचेही मोजमाप क रण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन निर्देश डावलून कि ती ब्रॉस उपसा झाला हे कळाले नसल्याचे पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)
काही वाळूपट्टे बंद होणार, साठेही जप्त करण्याचे आदेश
देवठाणा - उस्वद, उस्वद - देवठाणा, कानडी, सासखेडा, इंचा, दुधा, वाघाळा व भुवन या वाळू पट्ट्यांचे मोजमाप केले आहे. तर उस्वद - देवठाणा, पूर्णा पाटी, सासखेडा, इंचा, दुधा, टाक ळखोपा,वाघाळा, वझर सरकटे, कि र्ला व भुवन या ठिक ाणाहून पावसाळ्यात विक्री करण्यासाठी केलेले वाळू साठे जप्त करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठ्यांना देण्यात आले आहे. या क ारवाई अनेक वाळू पट्टे बंद होणार आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Measuring sands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.