गादी घरास आग ; लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:04 IST2021-04-10T04:04:21+5:302021-04-10T04:04:21+5:30
मध्य वस्ती असलेल्या मेहताब नगरातील सारा स्कूलजवळ शहानूर मन्सुरी यांचे गादी घर आहे. या गादीघरास पाच ...

गादी घरास आग ; लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात
मध्य वस्ती असलेल्या मेहताब नगरातील सारा स्कूलजवळ शहानूर मन्सुरी यांचे गादी घर आहे. या गादीघरास पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. गादी घराशेजारील रहिवाशांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सुमारे दीड तासांत ही आग विझविण्यात आली. आगीत लाखोंचे सामान जळून राख झाले. आग नेमकी कशामुळे लागली कारण अस्पष्ट आहे. या आगीत गादी बनवण्याचा कापूस, विविध प्रकारचे कापड, ताडपत्री साहित्य जळून खाक झाले.
दरम्यान, आग विझविण्यासाठी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. मात्र, अग्निशमन बंबाची गाडी एेन वेळेवर बंद पडली. त्यानंतर खासगी टॅंकरच्या मदतीने व नळाला पाणी सोडून आग विझविली गेली.
अग्निशमन दलाचा कर्मचारी निलंबित
अग्निशमन दलाच्या गाडीची निष्काळजीपणाने हाताळणी केल्याचा ठपका ठेवून न. प. कर्मचारी रमेश थोरात यास निलंबित करण्यात आले. इंजिनिअर प्रशांत मेश्राम व निरीक्षक देवीदास पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अग्निशमन दलाची गाडी दुरूस्तीसाठी देण्यात आली आहे. असे नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी सांगीतले.