मुलीला घाटीत टाकून माता पसार
By Admin | Updated: July 22, 2014 00:48 IST2014-07-22T00:39:41+5:302014-07-22T00:48:30+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या आवारात स्त्री जातीची दोन अर्भके कॅरिबॅगमध्ये फेकून मातेने पलायन केल्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी पुन्हा मुलगी नको, या मानसिकतेचा अनुभव घाटीत आला.

मुलीला घाटीत टाकून माता पसार
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या आवारात स्त्री जातीची दोन अर्भके कॅरिबॅगमध्ये फेकून मातेने पलायन केल्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी पुन्हा मुलगी नको, या मानसिकतेचा अनुभव घाटीत आला. आपल्या अवघ्या दोन महिन्याच्या मुलीला घाटी रुग्णालयात बेवारस सोडून मातेने पलायन केल्याची घटना समोर आली आहे.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी दुपारी घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २८ समोर एक बाळ रडत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडले. कर्मचाऱ्यांनी या बाळाला उचलले. ती मुलगी असल्याचे समोर आले. या मुलीला सध्या घाटीत ठेवण्यात आले आहे.
मुलगी नको, या मानसिकतेतून निर्दयी मातेने या बाळाला घाटीत बेवारस सोडून पळ काढला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
‘त्या’ अर्भकांचा तपास थंडावला
घाटी रुग्णालयाच्या आवारात पाच दिवसांपूर्वी कॅरिबॅगमध्ये मृतावस्थेतील दोन स्त्री जातीची अर्भके फेकूनदिलेली आढळून आली होती. हा अवैध लिंगभेद चाचणी आणि गर्भपाताचा प्रकार असल्याचा दाट संशय आहे.
या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, अद्याप बेगमपुरा पोलिसांना या प्रकरणाचे काहीही धागेदोरे सापडलेले नाहीत. बेगमपुरा पोलिसांनी हा तपासच थंड्या बस्त्यात टाकलेला दिसून येत आहे.