मास्टर्स आॅफ लिबरल आर्टस् अभ्यासक्रम यंदापासून

By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T00:47:01+5:302014-05-23T01:09:16+5:30

औरंगाबाद : नव्या शैक्षणिक वर्षापासून (२०१४-१५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्कूल आॅफ लिबरल आॅर्टस् हा नवीन विभाग सुरू होत आहे

Masters of Liberal Arts Course | मास्टर्स आॅफ लिबरल आर्टस् अभ्यासक्रम यंदापासून

मास्टर्स आॅफ लिबरल आर्टस् अभ्यासक्रम यंदापासून

औरंगाबाद : नव्या शैक्षणिक वर्षापासून (२०१४-१५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्कूल आॅफ लिबरल आॅर्टस् हा नवीन विभाग सुरू होत आहे. मास्टर्स आॅफ लिबरल आॅर्टस् हा अभ्यासक्रम प्रारंभ करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील पहिले विद्यापीठ आहे. ही माहिती विद्यापीठ सल्लागार मंडळाचे चेअरमन डॉ. वि. ल. धारूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ.धारूरकर म्हणाले, लिबरल आर्टस् हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. जागतिकीकरणानंतर जग जवळ येऊ लागले आहे. विशेषत: शासकीय नोकरीत येऊ इच्छिणार्‍यांना हा अभ्यासक्रम अत्यंत उपयोगी ठरणार आहे. रेग्युलरसाठी प्रवेश घेऊन हा अभ्यासक्रम आंतरशाखीय पद्धतीनेही शिकता येणार आहे. त्यासाठी मूळ शाखेसोबतच लिबरल आर्टस्चे दोन पेपर प्रत्येक सेमिस्टरला देता येतील. त्यासाठी फीदेखील अत्यंत कमी चार हजार रुपये आहे, असे डॉ. धारूरकर यांनी सांगितले. या विभागासाठी १ प्रोफेसर, २ सहयोगी प्रोफेसर आणि ४ सहायक प्रोफेसर, अशा पदांचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला आहे. या पदांना मान्यता मिळताच विद्यापीठाकडून ही पदे भरण्यात येतील. तोपर्यंत मी स्वत: या विभागातील विद्यार्थ्यांना शिकविणार आहे, असे धारूरकर म्हणाले. त्याशिवाय विविध विभागातील प्राध्यापकांना गेस्ट लेक्चरर म्हणून बोलविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.मास्टर्स आॅफ लिबरल आर्टस् ही पदवी संपादन करणार्‍यांना पत्रकारिता, उद्योग, जाहिरात विभाग, सिव्हिल सर्व्हिसेस, बँकिं ग, एनजीओ, अकॅडमिक क्षेत्र, संशोधन, लेखन, विश्लेषण आदी क्षेत्रात उत्तम संधी मिळू शकतात. व्यापक आणि समावेशक दृष्टिकोन देणारा हा अभ्यासक्रम आहे.या बदलत्या जगाबरोबर आपण बदललो नाही तर मागे पडू शकतो. त्यामुळे आधुनिक प्रशिक्षण देणारा हा अभ्यासक्रम आहे. यात पुरातत्व, मानवंशशास्त्र, बदलते कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन आदी विविध विषयांचा अंतर्भाव आहे.

Web Title: Masters of Liberal Arts Course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.