नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By Admin | Updated: June 2, 2014 00:47 IST2014-06-01T23:52:48+5:302014-06-02T00:47:37+5:30

बीड: येथील बार्शी नाका भागात शुक्रवारी नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला़ पाच जणांविरुद्ध विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला़

Massive efforts of nursing students | नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

 बीड: येथील बार्शी नाका भागात शुक्रवारी नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला़ पाच जणांविरुद्ध विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला़ पीडित विद्यार्थिनी २१ वर्षांची असून तिचे गाव आहेर धानोरा हे आहे़ ती बीडमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेते़ ‘तुझा भाऊ बार्शी नाक्यावर दारु पिऊन पडल्याची बतावणी फोनवरुन केली़ त्यानंतर ती तेथे पोहोचली़ त्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करण्यात आला़ एवढेच नाही तर तिला मारहाण देखील केली़ तिच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात नितीन बबन इंगोले, सचिन बबन इंगोले, वैष्णवी नितीन इंगोले, रुपाली सचिन इंगोले , विजूबाई बबन इंगोले (सर्व रा़ आहेर धानोरा ता़ बीड) यांच्याविरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला़ सर्व आरोपी फरार आहेत़ उपअधीक्षक अभय डोंगरे तपास करत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Massive efforts of nursing students