मेस्कोचे कर्मचारी वेतनाविनाच

By Admin | Updated: January 13, 2015 00:14 IST2015-01-12T23:49:18+5:302015-01-13T00:14:58+5:30

बीड :महावितरणच्या बीड विभागात मेस्को कंपनीअंतर्गत कार्यरत तब्बल २५ कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून पगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

Mascot employees are not without salary | मेस्कोचे कर्मचारी वेतनाविनाच

मेस्कोचे कर्मचारी वेतनाविनाच


बीड :महावितरणच्या बीड विभागात मेस्को कंपनीअंतर्गत कार्यरत तब्बल २५ कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून पगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारीबाबत सुरूवातीपासून महावितरण कंपनीकडून निर्धारीत वेळेत मेस्कोकडे धनादेशाची पुर्तता झाली नाही. सध्या धनादेशाची पुर्तता झाली आहे तर कंपनीकडूनच पगार करण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनी व मेस्कोचा कारभार यामध्ये कर्मचाऱ्यांची तारांबळ होत आहे.
या कंपनीमधील सर्वच कर्मचारी हे माजी सैनिक आहेत. सेवानिवृत्ती नंतर उदनिर्वाहसाठी महाराष्ट्र एक्स सर्व्हिस कॉर्परेशन अंतर्गत येथील महावितरणच्या विभाग कार्यालयात ५० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. नोकरीच्या काळात देशसेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर सध्या उदरनिर्वाहासाठी नोकरीची वेळ आली आहे. या कंपनीअंतर्गत देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या पगारीवर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र जून २०१४ पासून कर्मचाऱ्यांच्या पगारी नाहीत त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मेस्कोकडून सुरवातीच्या काळात नियमित पगार करण्यात आल्या मध्यंतरीच्या काळात महावितरण कंपनीकडून धनादेशाची सादर करण्यास दिरंगाई झाली व त्याचेच सबब पुढे करीत या कर्मचाऱ्यांच्या तब्बल ६ महिन्यापासून पगारी झालेल्या नाहीत.
दोन दिवसातच पगाराची पुर्तता
गेल्या सहा महिन्यापासून महावितरण कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पगारीचा धनादेश मिळालेला नव्हता. दोन दिपसापूर्वीच अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांच्या मध्यस्तीनंतर धनादेशाची पुर्तता झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असून दोन दिवसातच कर्मचाऱ्यांच्या पगारी केल्या जाणार असल्याचे सुपरवायजर सानप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Mascot employees are not without salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.