बलात्कार करून विवाहितेचा खून
By Admin | Updated: April 23, 2015 00:45 IST2015-04-23T00:37:54+5:302015-04-23T00:45:08+5:30
भोकरदन : विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी भोकरदन शहरात्णा घडली

बलात्कार करून विवाहितेचा खून
भोकरदन : विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी भोकरदन शहरात्णा घडली. याप्रकरणी मयताचा सख्खा चूलत भाऊ रमेश मधुकर कुऱ्हाडे (वय २६) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत मयताचा भाऊ राजू कुऱ्हाडे यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बहिण सविता रोहिदास धोत्रे (वय २५, रा. धुळे, ह.मु. भोकरदन) ही सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरोपी रमेश कुऱ्हाडे व मयताचा मामा फकिरा पवार यांच्यासोबत टिव्ही दुरूस्त करून आणण्यासाठी ३ वर्षाच्या मुलाला घरी ठेवून बाहेर गेली. मात्र रात्री ती घरी परतलीच नाही. तसेच मामा हा टिव्हीच्या दुकानावर रमेश व सविताची प्रतीक्षा करत बसला. परंतु ते दोघेही तेथे न आल्याने मामा घरी परतले. त्यानंतर रमेश काही वेळाने घरी आला व सविता येईल, असे त्याने सांगितले. परंतु सर्वांनी सोबत जेवण केल्यानंतर देखील सविता न आल्याने तिचा शोध सुरू झाला. २१ एप्रिल रोजी सविताचा शोध लागलाच नाही. २२ रोजी शहरातील न्यू हायस्कूलच्या पाठिमागे केळणा नदीच्या काठावर राजू गोराडे यांना मक्याच्या शेतात सविताचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.
पोलिस उपअधीक्षक विशाल गायकवाड, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक विकास कोकाटे, एस.व्ही. कुरेवाड, रामेश्वर शिनकर, दत्तात्रय कोनार्डे, एस.जी. चौधरी, एम.व्ही. बहुरे, डी.सी. सवडे, गणेश पायघन यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला.
या ठिकाणी मक्याचे पीक मोडल्याचे दिसून आले. तसेच तिचा गळा दाबून खून केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरविली.
संशयित आरोपी म्हणून रमेश कुऱ्हाड यास ताब्यात घेतले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पतीने सोडल्यामुळे सविता ही गेल्या ३ वर्षांपासून भोकरदन येथे आई-वडिलांसमवेत राहत होती. आरोपीने दारूच्या नशेत क्रुरकृत्य केल्याचा संशय आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची खातरजमा सुरू आहे.
४भोकरदन ग्रामीण रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी नाही. तसेच इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची सुविधा नसल्याने मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. वैद्यकीय अहवालानंतर बलात्कार प्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.