अतिक्रमण नियमित करण्यासाठी दाम्पत्याचे उषोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:17+5:302021-02-05T04:08:17+5:30
सोयगाव : १९८३ पूर्वीचे शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करा, असा आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिलेला आहे. तरीदेखील महसूल ...

अतिक्रमण नियमित करण्यासाठी दाम्पत्याचे उषोषण
सोयगाव : १९८३ पूर्वीचे शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करा, असा आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिलेला आहे. तरीदेखील महसूल प्रशासन अंमलबजावणी करीत नाही. म्हणून गलवाडा येथील वृद्ध दाम्पत्याने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे; मात्र या उपोषणाकडे महसूल विभागाकडून कानाडोळा केला जात असल्याचे उषोषणकर्त्या दाम्पत्याने सांगितले.
गलवाडा येथील १९८३ पूर्वी शासकीय पड गट क्र-८० मधील १ हेक्टर ६० आर या क्षेत्रावर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाचा मोबदला म्हणून या दाम्पत्यांनी भरला आहे. त्यावरून १९९० च्या शासन निर्णयनुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी जमीन कसत असलेल्यांच्या नावे अतिक्रमण नियमित करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले होते. त्यामुळे आदेश देऊनही जागा नावावर का केली जात नाही. ही जमीन त्वरित नावे करून देण्यात यावी, अशी मागणी यशवंत गायकवाड, वत्सलाबाई गायकवाड या दाम्पत्याने केली आहे. प्रजासत्ताक दिनापासून त्यांचे बेमुदत उषोषण सुरू केले आहे.
-----------------
---छायाचित्र ओळ - सोयगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण करताना वृद्ध दाम्पत्य.