काठोड्यात जाळून घेऊन विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: March 19, 2016 00:58 IST2016-03-19T00:12:50+5:302016-03-19T00:58:04+5:30

जातेगाव : गेवराई तालुक्यातील काठोडा येथे एका विवाहितेने शुक्रवारी जाळून घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सोनाली ज्ञानेश्वर गरडे (वय २५) असे मयत विवाहितेचे नाव आहे

Marital suicide by burning a grinder | काठोड्यात जाळून घेऊन विवाहितेची आत्महत्या

काठोड्यात जाळून घेऊन विवाहितेची आत्महत्या


जातेगाव : गेवराई तालुक्यातील काठोडा येथे एका विवाहितेने शुक्रवारी जाळून घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
सोनाली ज्ञानेश्वर गरडे (वय २५) असे मयत विवाहितेचे नाव आहे. राहत्या घरी तिने शुक्रवारी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
तलवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाले.
सोनाली हिचा दोन वर्षापूर्वीच विवाह झाला होता. तिला चार महिन्याचा एक मुलगा आहे. तिच्या मृत्यूमुळे त्याचे मातृछत्र हरवले आहे. आत्महत्येमागचे कारण स्पष्ट नाही. (वार्ताहर)

Web Title: Marital suicide by burning a grinder