५० लाखासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:05 IST2021-07-02T04:05:32+5:302021-07-02T04:05:32+5:30

---------------------------------- दोन मोटारसायकलींची चोरी औरंगाबाद : शहरातून चोरट्यांनी दोन मोटारसायकल लंपास केल्या. हर्सूल परिसरातील सोनाईनगर येथील घरासमोर उभी ...

Marital harassment for Rs 50 lakh | ५० लाखासाठी विवाहितेचा छळ

५० लाखासाठी विवाहितेचा छळ

----------------------------------

दोन मोटारसायकलींची चोरी

औरंगाबाद : शहरातून चोरट्यांनी दोन मोटारसायकल लंपास केल्या. हर्सूल परिसरातील सोनाईनगर येथील घरासमोर उभी मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. विठ्ठल हरिचंद बमणे यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली.

दुसऱ्या घटनेत सिडको एन-६ येथील एमजीएम रुग्णालयासमोर उभी मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. या चोरीप्रकरणी मोहम्मद रिजवान मोहम्मद खदीर यांनी सिडको ठाण्यात तक्रार नाेंदविली.

---------------------------------------------------

मटका खेळणाऱ्यावर कारवाई

औरंगाबाद : चंपा चौक येथील रिक्षाथांब्याजवळ मटका खेळणाऱ्या तीन जणांवर सिटी चौक ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ३० जून रोजी दुपारी धाड टाकली. आरोपींकडून ८१० रुपये रोख आणि मटक्याच्या चिठ्ठ्या हस्तगत केल्या. सय्यद अनवर सय्यद अय्युब, सय्यद अल्ताफ, सय्यद अली, अशी जुगाऱ्यांची नावे आहेत.

------------------------------------

फ्लॅट खरेदीसाठी विवाहितेचा छळ

औरंगाबाद : फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावे, याकरिता विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून सिडको पोलिसांनी पतीसह चार जणांवर गुन्हा नोंदविला. याविषयी विवाहितेने पोलिसात तक्रार नाेंदविली. डुवेन डॉमनिक परेरा, डॉमनिक परेरा, सॅम्युअल परेरा आणि महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Web Title: Marital harassment for Rs 50 lakh