विवाहितेचा छळ, सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:05 IST2021-02-07T04:05:12+5:302021-02-07T04:05:12+5:30

वैजापूर : गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण, अशी मागणी करत, विवाहितेला मारहाण करून तिचा छळ करणाऱ्या ...

Marital harassment, crime against five in-laws | विवाहितेचा छळ, सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

विवाहितेचा छळ, सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

वैजापूर : गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण, अशी मागणी करत, विवाहितेला मारहाण करून तिचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यात मजहर मंजूर पठाण (पती), नफीसा पठाण (सासू), मंजूर पठाण (सासरा), मुनवर पठाण (दीर, सर्व रा. मिल्लतनगर, ता.वैजापूर), नुसरत पठाण (नणंद, रा. कटकटगेट, औरंगाबाद), झीनत पठाण (नणंद, रा.वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींंची नावे आहेत.

या घटनेतील पीडित समरीन (२१, रा.खंडाळा) हिचा विवाह २०१९ मध्ये वैजापूरच्या मजहर पठाण याच्यासोबत झाला होता. पत्नीला दहा महिने चांगली वागणूक दिल्यानंतर, पती मजहरने तिला ‘गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण,’ असे म्हणत असे. मात्र, वडिलांची परिस्थिती हलाखीची असून, ते ही रक्कम देऊ शकत नाहीत, असे विवाहितेने पतीला सांगितले. या दरम्यान सासरच्या लोकांनीही विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. पीडितेचे वडील तिला भेटण्यासाठी नुकतेच वैजापूरमधील मिल्लतनगर येथे आले होते. यावेळी सासरच्या मंडळींनी पीडितेसह तिच्या वडिलांंना शिवीगाळ करून हाकलून दिल्याने महिला वडिलांसोबत खंडाळा येथे माहेरी आली. वारंवार छळ होत असल्याने अखेर या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Marital harassment, crime against five in-laws