शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वेतनश्रेणीतील तफावत; ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: June 29, 2014 00:25 IST

नांदेड: ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्याबाबत राज्य शासन उदासीनता दाखवित असल्याच्या निषेधार्थ राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्ह्यात २ जुलैपासून कामबंद

नांदेड: ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्याबाबत राज्य शासन उदासीनता दाखवित असल्याच्या निषेधार्थ राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्ह्यात २ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य ग्रामसेवक युनियनचे नेते एऩडी़ कदम यांनी दिली़ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी एकच असल्यामुळे कालबद्ध पदोन्नतीमध्ये त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे ग्रामसेवक संवर्गात नाराजी पसरली आहे. वर्षभरात अनेकवेळा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन, मोर्चा, कामबंद आंदोलन करण्यात आले. परंतु याबाबतचा तोडगा मात्र अद्यापही निघाला नाही.८७ हून अधिक मूळ कामे सांभाळत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामसेवकांमार्फत केली जाते. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या जवळपास १३८ योजनांचा भार ग्रामसेवकांवर आहे. गेल्यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीत राज्यातील ग्रामसेवकांनी एक दिवसाचे वेतन देत दुष्काळग्रस्त भागात अत्यवस्थ सुविधा पुरविण्याचे काम केले. राज्यात कुठेही मोर्चा, धरणे, रास्तारोको झाला नाही. तरीही शासनाने ग्रामसेवक संवर्गाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या वेतनश्रेणीतील तफावतीकडे दुर्लक्ष केले. ग्रामसेवकांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करावी, ग्रामपंचयात स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ सेवेत रुजू झाल्यापासून ग्राह्य धरावा, २० ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी (पंचायत) पद निर्माण करावे, सर्व संवर्गाकरिता बदलीचे धोरण एकच करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)ग्रा.पं. च्या चाव्या, शिक्के परत करणारया आंदोलनाअंतर्गत ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २ जुलै रोजी सर्व ग्रामपंचायतींच्या चाव्या, शिक्के संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येतील आणि त्यानंतर विभागनिहाय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. १४ व १५ जुलै रोजी औरंगाबाद विभागातील ग्रामसेवक आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतील. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे मानद अध्यक्ष श्यामराव मुत्यालवार, सचिव पी. जे. नागेश्वर, उत्तम देशमुख आदींनी केले आहे. पाचव्या वेतन आयोगात ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीत फरक होता. मात्र सहाव्या वेतन आयोगात ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी एकाच वेतनश्रेणीत आले. ही तफावत दूर करणे आवश्यक आहे.- एन. डी. कदमविभागीय अध्यक्ष, राज्य ग्रामसेवक युनियन