शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मराठवाडा की ‘भाजप’ विकास मंडळ?; लेटरहेडचा गैरवापर करत अध्यक्षांनी केले राजकीय विश्लेषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:35 IST

मराठवाडा विकास मंडळाचा कारभार सध्या ‘भाजप’ संघटन विकासाच्या दिशेने सुरू झाला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देलेटरहेडचा केला गैरवापरमुख्यमंत्र्यांना दिला संघटन सारांश म्हणाले, बूथचे रचनेचे काम जोरात आहे

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाचा कारभार सध्या ‘भाजप’ संघटन विकासाच्या दिशेने सुरू झाला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. मंडळाच्या लेटरहेडवर पक्षबांधणी, बुथबांधणी, शक्तिकेंद्र प्रमुखांचा सन्मान, इतर राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याने मंडळ मराठवाड्याच्या विकासासाठी आहे की भाजपच्या, यावरून संताप व्यक्त होत आहे. 

मंडळ अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद तथा बुथ संपर्क अभियानाची माहिती मंडळाच्या लेटरहेडवर दिली आहे. त्यांनी अहवालात म्हटले आहे, मी सरकारतर्फे  ग्रामीण निवासी दौरा करीत आहे. त्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या भागामध्ये आपल्या सरकारमार्फत जाहीर केलेल्या सवलती तथा योजनांची माहिती देत आहे. चारा छावणीला की दावणीला ही कल्पना शेतकऱ्यांना पटते आहे. मनरेगासंबंधित माहिती देऊन फॉर्म नं.४ भरून घेत आहे. तसेच मुख्यमंत्री चषकासाठी तरुणांना माहिती देऊन फॉर्म भरून घेतले आहेत. सोबतच बुथ रचनेचा आढावा घेतला. ज्यामध्ये जे अद्याप गठित झालेले नव्हते, त्यांचे गठण केले. बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुखांना प्रमाणपत्र व छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव केला. तसेच विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून घेतला. 

मंडळाचे लेटरहेड हे वैधानिक आहे. त्यामुळे त्याचा संघटना, राजकीय पक्षप्रवेश, बुथबांधणी आदी घटकांसाठी वापर करणे हे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत. मात्र, अध्यक्ष डॉ. कराड यांनी याप्रकरणी दावा केला की, मंडळाच्या कुठल्याही साधनांचा पक्षकार्यासाठी वापर केला जात नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे त्यांना दुष्काळी भागात केलेल्या कामांचे निवेदन दिले. त्या निवेदनावर दुष्काळात काय काम केले जात आहे, त्याची माहिती दिली. चारा छावणी, जनावरांची स्थिती, पाणीटंचाई, रोजगारासाठी मनरेगाची माहिती देण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करीत आहे. यासाठी मंडळाचे वाहन, चालक वापरले जात नाही, मी खाजगी वाहनातून फिरतो आहे. बुथबांधणीची, पक्षप्रवेशाची माहिती त्यांना असावी, म्हणून निवेदनात उल्लेख केला. मंडळात पक्षबैठक घेऊन इतर साधने वापरलेली नाहीत. बुथ, शक्तिकेंद्र, पक्षप्रवेशाचा निवेदनात उल्लेख आहे, हे मात्र खरे.

अध्यक्षांनी पक्षकामासाठी लेटरहेड वापरू नयेमंडळ अध्यक्ष डॉ. कराड यांनी धडाडीने काम सुरू केले आहे; परंतु त्यांनी मंडळाच्या साधनांचा वापर राजकारणासाठी करू नये. राजकीय पक्षाचा प्रचार लेटरहेडवरून करणे, ही खेदजनक बाब आहे. ही निषेधार्ह बाब आहे, अध्यक्षांना याबाबत कुणीतरी समज द्यायला हवी. आठ ते दहा वर्षांनी या मंडळाला अध्यक्ष मिळाले आहेत. त्यांनी जर असे राजकीय दृष्टीने काम सुरू केले तर दुर्दैव आहे. मंडळाबाबत उलटसुलट मतप्रवाह आहेत. मंडळ काही करीत नाही, नुसते ठराव घेते असे बोलले जाते. पद आणि सत्तेचा वापर करून विभागाला निधी मिळविण्याचे काम अध्यक्षांनी करावे. त्यांनी संघटन बांधणीसाठी मंडळाचे दस्तवेज वापरू नयेत.-डॉ. व्यंकटेश काब्दे, तज्ज्ञ समिती सदस्य, मराठवाडा विकास मंडळ 

लेटरहेड वापरणे चुकीचेमराठवाडा विकास मंडळ राजकीय कामाचे व्यासपीठ होऊ नये. ती वैधानिक रचना असून विभागाच्या अनुशेषासाठी त्या मंडळाला घटनात्मक दर्जा आहे. त्यामुळे मंडळाचे पावित्र्य जपणे हे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या तरतुदीनुसार स्थापन झालेले कायदेशीर अधिकार असलेले मंडळ आहे. संशोधन आणि अभ्यास करून ते विभागाच्या अनुशेषाबाबत संतुलित माहिती पुरविण्यासाठी व शिफारस करण्यासाठी निर्माण केले आहे. पक्षातीत दृष्टिकोनातून मंडळावर काम होणे अपेक्षित आहे. राजकीय कामकाजासाठी मंडळाचे लेटरहेड वापरणे चुकीचे आहे. पत्रव्यवहारात पक्ष संघटनाबाबत उल्लेख होऊ नये, याचे पथ्य यापुढे अध्यक्ष व इतरांनी पाळले पाहिले. -अ‍ॅड. प्रदीप देशमुख, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद  

टॅग्स :BJPभाजपाMarathwadaमराठवाडाChief Ministerमुख्यमंत्री