मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरुंच्या दालनाची तोडफोड

By Admin | Updated: February 11, 2017 16:33 IST2017-02-11T16:33:26+5:302017-02-11T16:33:26+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविपचे कार्यकर्ते आणि बहुजन क्रांती युवक मोर्चातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. या वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले

Marathwada University's Vice Chancellor | मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरुंच्या दालनाची तोडफोड

मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरुंच्या दालनाची तोडफोड

 ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 11 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार अशोक मोडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बहुजन क्रांती युवक मोर्चाकडून महात्मा फुले, सावित्रीबाई आणि रमाई यांची पुण्यतिथी साजरी केली नसल्यामुळे आक्षेप घेण्यात आला.
 
याचदरम्यान अभाविपचे कार्यकर्तेही दाखल झाले. या दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे पर्यावसान हाणामारीमध्ये झाले. यात कुलगुरू डॉ.बी.ए. चोपडे यांच्या दालनाची तोडफोड करण्यात आली. दरम्यान याबाबतची माहिती तातडीने पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 
 
 
 

Web Title: Marathwada University's Vice Chancellor