मराठवाडा तहानलेलाच; राज्यातील धरणे ६५ % जलयुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 07:11 PM2019-09-03T19:11:59+5:302019-09-03T19:14:51+5:30

मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांत उपयुक्त साठा अत्यल्प आहे.

Marathwada thirsty; Dams in the state are 5% waterlogged | मराठवाडा तहानलेलाच; राज्यातील धरणे ६५ % जलयुक्त 

मराठवाडा तहानलेलाच; राज्यातील धरणे ६५ % जलयुक्त 

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यात पाणीटंचाई जाणवणार 

औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांत अजूनही पाण्याचा खडखडाट आहे. राज्यातील धरणांमध्ये १४४४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची क्षमता असून, सोमवार (दि. २) अखेरीस त्यात ९३२.१४ टीएमसी (६४.५५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात ६५.३४ टक्के पाणीसाठा होता. 

कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणेच जलयुक्त झाली असून, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांत उपयुक्त साठा अत्यल्प आहे.जून महिन्यात मान्सून कोरडा गेल्यानंतर जुलैचा शेवटचा आणि आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली आहेत. कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील कोयना, राधानगरी, वारणावती, दूधगंगा, भाटघर, नीरा देवघर, वीर, पानशेत, वरसगाव, मुळशी, पवना, डिंभे, चासकमान ही धरणे भरली आहेत. भीमा खोऱ्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे राज्यातील सर्वात मोठे धरण उजनीत ११७.४७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

पाणीटंचाई जाणवणार 
औरंगाबाद विभागात ७९.८० टीएमसी (३०.६६ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी तो २८ टक्के होता. नागपूर विभागामध्ये ८७.१९ टीएमसी (५३.६ टक्के) पाणीसाठा असून, गेल्यावर्षी तो ४९.८८ टक्के होता. या भागामध्ये यंदा पाणीटंचाई जाणवेल अशीच स्थिती आहे.  
 

50
मराठवाडा, विदर्भातील बहुतांश तालुक्यांत सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस आॅगस्ट अखेरीस झाला आहे. अमरावती विभागात ५०.८२ टीएमसी (३४.३२ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात येथे ५५.६७ टक्के पाणीसाठा होता. 

90
औरंगाबाद विभागाची जीवनवाहिनी जायकवाडी (पैठण) धरणात गोदावरीतील पाणी जमा झाल्याने धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला होता. 

105
या धरणाची क्षमता १०५ टीएमसी असून, ७६.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात ६५.५६ टीएमसी उपयुक्तपाणीसाठा आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या वैनगंगेवरील गोसी खूर्द प्रकल्पात १६.२७ टीएमसी (६२.२७ टक्के) पाणीसाठा आहे.

20
अमरावती विभागातील काटेपूर्णा, इसापूर, अरुणावती आणि पूस धरणातील पाणीसाठा २० टक्केही नाही. औरंगाबाद विभागातील मांजरा, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि निम्न दुधनात उपयुक्त साठा शून्य आहे. नागपूर विभागातील बावनथडीमध्ये साडेपाच, दिना शून्य, खिडसी १७.२९ आणि तोतलाडोह ३८, कामठी खैरी २९.५९, निम्न वर्धा ४६, बोर धरणात ४२.३१ टक्के पाणीसाठा आहे. 

Web Title: Marathwada thirsty; Dams in the state are 5% waterlogged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.