शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक: १४ उमेदवार, ६१ हजार मतदार; सकाळच्या सत्रात संथ सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 11:49 IST

गुरुजी निवडणार आमदार; मराठवाड्यात २२७ केंद्रांवर मतदान सुरु 

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, सोमवारी (३० जानेवारी) सकाळी ८ वाजेपासून २२७ मतदान केंद्रांवर मतदान सुरु  झाले आहे. या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, ६१ हजार ५२९ मतदारांना मत देण्याचा अधिकार आहे. मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत असून सकाळच्या सत्रात संथ प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. 

२ फेब्रुवारीला चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्ष, संघटनांसह अपक्षांमुळे बहुरंगी निवडणूक होत आहे. शनिवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर प्रमुख उमेदवारांनी गुप्त बैठकांवर भर दिला. दरम्यान, आज सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी लातूर येथे, भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी औरंगाबाद तर मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी कंधार तालुक्यातील प्रियदर्शिनी हायस्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ११.१४ टक्के मतदान झाले आहे. हीच गती राहिली तर ५० टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. 

आठ जिल्ह्यांत एकूण २२२ मूळ, तर ५ सहायक अशी एकूण २२७ मतदान केंद्रे आहेत. मतदानानंतर सर्व मतपेट्या सील करून पोलिसांच्या बंदोबस्तात चिकलठाण्यातील मतमोजणी केंद्रातील स्ट्राँग रूमकडे पाठविण्यात येतील. २ फेब्रवारीला सकाळी मतमोजणी सुरू होईल. औरंगाबादमध्ये ५३, जालन्यात १५, परभणीत १८, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये ३०, बीडमध्ये ३४, लातूरमध्ये ४०, उस्मानाबादमध्ये २५ अशी एकूण २२७ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रावर अखंडितपणे व्हिडिओग्राफी व वेबकास्टिंग केले जाणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान करण्याची मुभा मतदारांना आहे. मतमोजणीच्या वेळी उमेदवाराच्या मताची सरमिसळ करून मतमोजणी होणार असल्याने मतदाराचे मत गोपनीय राहणार आहे.

मतदार ओळखपत्राशिवाय १० पुरावे ग्राह्यनिवडणुकीत मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, त्यांना ओळख पटविण्यासाठी इतर १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. यात आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, आस्थापनांचे ओळखपत्र, लोकप्रतिनिधी ओळखपत्र, मतदारसंघातील संस्थासेवांचे ओळखपत्र, विद्यापीठ पदवी-पदविका प्रमाणपत्र, दिव्यांगत्व मूळ प्रमाणपत्र, केंद्र शासनाचे युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय मतदार असे......जिल्हा - पुरुष मतदार - महिला मतदार – एकूण मतदारऔरंगाबाद - ८७०५            - ५२१९ - १३९२४जालना - ४१८६            - ८५१ - ५०३७परभणी - ३७९८            - ६७४ - ४४७२हिंगोली - २५८०             - ४८० - ३०६०नांदेड - ७००८             - १८१३ - ८८२१बीड - ७७५०            - २०१९ - ९७६९लातूर - ८५२७            - २७३७ - ११२६४उस्मानाबाद - ४२२६             - ९५६ - ५१८२एकूण - ४६७८० - १४७४९ - ६१५२९

टॅग्स :AurangabadऔरंगाबादlaturलातूरNandedनांदेडElectionनिवडणूकTeacherशिक्षकVidhan Parishadविधान परिषद