शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात अवकाळी पावसाचे तांडव; पाच जणांचा वीज पडून मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:03 IST

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबी पिकांसह घरांचेही नुकसान झाले आहे.

औरंगाबाद : अवकाळी पावसाने मराठवाड्यात तांडवच घातले आहे. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला. तर ३९ शेळ्या-मेंढ्यासह तीन जनावरे दगावली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबी पिकांसह घरांचेही नुकसान झाले आहे.

भोकर, कंधारमध्ये दोन ठारनांदेड शहर व जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला़ या पावसाने आंबा, केळी पिकांचे नुकसान झाले़ त्याचवेळी अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले़ भोकर आणि कंधार तालुक्यात वीज पडून दोन जण मरण पावले.मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पाऊस सुरु झाला़ वाऱ्यांबरोबर पावसाचा जोर वाढत गेला़ पाऊण तास पाऊस झाला़ दरम्यान, भोकर येथे दासा गणेश उपाटे (वय ४२, रा़बारड) यांचा वीज पडून मृत्यू झाला़ तर नावंद्याचीवाडी (ता.कंधार) येथील अनिताबाई व्यंकटी केंद्रे (वय ४५) या शेतात चारा आणायला गेल्या होत्या. वीज कोसळून त्या भाजल्या. त्यांना कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत गजानन केंद्रे हा जखमी झाला़ कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ़अरविंद फिसके व पार्वती वाघमारे यांनी उपचार करून त्याला नांदेड येथे हलविले़ तसेच जिल्ह्यात नायगाव, लोहा, भोकर, नरसी, मुदखेड तालुक्यात पाऊस झाला़ ग्रामीण भागात घरांवरील पत्रे उडाले़ रस्त्यावरील वृक्षही उन्मळून पडले़ नांदेड शहरातही पाऊस सुरु होताच वीजपुरवठा ठप्प झाला़ 

झाडाचा आसरा घेणे ह्यत्यांच्याह्ण जिवावर बेतलेविजांचा कडकडाट झाला अन् अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. म्हणून तिघे मेंढपाळ मेंढ्यासह लिंबाच्या झाडाच्या आसऱ्याला गेले. तिथेच घात झाला. त्याच झाडावर वीज पडून दोन मेंढपाळ जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. शिवाय ३९ शेळ्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथे घडली. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील सुरनवाडी येथील ३०० मेंढ्या आणि ५७ शेळ्यांचा कळप मागील तीन महिन्यांपासून पाथरी तालुक्यातील अंधापुरी शिवारात दाखल झाला होता. या मेंढ्यांचा सांभाळ करण्यासाठी ६ जण, तर शेळ्यांचा सांभाळ करण्यासाठी तीन जण आले होते. १५ एप्रिल रोजी अंधापुरी येथील शेतकरी चंद्रकांत मोरे यांच्या शेतात पिण्याच्या पाण्याची सोय असल्याने ते या भागात रमले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंधापुरी परिसरात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. या पावसापासून बचाव करण्यासाठी तीन मेंढपाळांनी शेळ्या-मेंढ्यासह शेतातील लिंबाच्या झाडाचा सहारा घेतला. ते झाडाखाली थांबले असता काही क्षणातच या झाडावर वीज कोसळली. त्यामध्ये लिंबाजी सीताराम काळे (३५) व कृष्णा रामभाऊ शिंदे (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रामभाऊ साधू शिंदे हे जखमी झाले. यावेळी ५७ पैकी ३९ शेळ्यांचाही मृत्यू झाला. याबाबतची माहिती अन्य शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर जखमी रामभाऊ शिंदे यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर दोन्ही मयतांचे मृतदेह पाथरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मंगळवारी शवविच्छेदन करुन दोघांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. 

बीडमध्ये एक ठारबीड जिल्ह्यात मंगळवारीदेखील काही तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूर तालुक्यातील हसनाबाद, कोळपिंप्री, पांगरी, आवरगाव परिसरात गारांसह पाऊस झाला. सोमवारी रात्री  देवदहीफळ येथे वीज पडून एक जण ठार झाला. गेवराई तालुक्यातील भोगलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान टरबुजाच्या शेतात काम करणाऱ्या अंजना दत्तात्रय लिंबुरे ( वय ३१) या महिलेच्या अंगावर वीज पडली. त्यांच्यावर सध्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सेनगावात मोबाईल मनोरा कोसळलासेनगाव (जि.हिंगोली) येथील २५० फूट उंच बीएसएनएलचा मनोरा मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने कोळसला. या मनोऱ्याखाली चार घरे, दोन जनावरे व एक चारचाकी वाहनही दबली आहेत. या घटनेत अशोक कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर घरातील आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अशोक कांबळे, सुनील रणबावळे, दीपक आठवले व अन्य एकजण यांच्या घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या जीवितहानी झाली नाही. हा मनोरा जुन्या ग्रामीण रूग्णालयाच्या दिशेने पडला. मागील अनेक वर्षांपासून या धोकादायक मनोऱ्याची साधी दुरूस्तीही करण्यात आली नव्हती. घटनेनंतर तास उलटला तरी प्रशासन घटनास्थळी आले नव्हते. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडटांसह १६ एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊस झाला.  वसमत तालुक्यातील कौठा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. दोन दिवसांपासून कौठा येथे वीज अखंडित आहे. कळमनुरीतही विजेच्या कडकडाटांसह वादळी वारे होते.  हळद व गव्हाचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यूMarathwadaमराठवाडा