शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा ही कलावंतांची भूमी

By admin | Updated: August 26, 2014 01:52 IST

औरंगाबाद : मराठवाडा ही लोककलावंतांची भूमी आहे. या भागातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असून, त्यांच्यामध्ये राज्यस्तरावर झळकण्याची क्षमता आहे

औरंगाबाद : मराठवाडा ही लोककलावंतांची भूमी आहे. या भागातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असून, त्यांच्यामध्ये राज्यस्तरावर झळकण्याची क्षमता आहे, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित युवा महोत्सव कार्यशाळेच्या समारोप समारंभात महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी मुंबई येथील लोककला अकादमीचे डॉ. गणेश चंदनशिवे, माजी अधिष्ठाता प्रा. दिलीप बडे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे, सल्लागार समिती सदस्य डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. राजेश करपे आदींची उपस्थिती होती. मनपा आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर तसेच राज्यस्तरावर नावलौकिक मिळविणारे कलावंत दिले. या मातीत उपजत कलेचा गुण आहे. त्यामुळे विद्यापीठाने युवा कलावंतांना युवक महोत्सवाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून युवा कलावंतांमधील कलेची प्रतिभा अधिकच बहरत गेली. यापुढेही विद्यापीठाने युवा कलावंतांना प्रोत्साहन द्यावे. या कार्यक्रमात डॉ. गणेश चंदनशिवे यांना संगीत कला अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाने आपणास प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आज राज्यस्तरावर लौकिक प्राप्त करूशकलो, अशी ग्वाही डॉ. चंदनशिवे यांनी दिली. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, मराठवाड्याला संतपरंपरेचा वारसा आहे. संतांनी या भागात लोकप्रबोधनाची परंपरा सुरू केली. नंतरच्या काळात लोककलावंतांनी प्रबोधनाची चळवळ पुढे नेली. विद्यार्थ्यांनी या परंपरेचा आदर्श ठेवला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी मानले.