शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

श्रावणातही मराठवाडा कोरडाच;जायकवाडी वगळता बहुतांश धरणे मृतसाठ्यात, काही कोरडीठाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 7:39 PM

१०० मि.मी. पावसाची तूट 

ठळक मुद्दे२२ लाख नागरिकांना टँकरचे पाणी

औरंगाबाद : श्रावण महिना शेवटच्या चरणात आहे, तरीही मराठवाडा अजून कोरडाच आहे. विभागात ९ आॅगस्टपासून पावसाने दडी मारली आहे. १०० मि.मी. पावसाची सध्या आवश्यकता असून, आजवर फक्त ३०२ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण ७७९ मि.मी. सरासरीच्या तुलनेत ४७६.८७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. हवामान खात्याच्या गणनेनुसार सध्या पावसाळ्याचे ४१ दिवस शिल्लक आहेत. 

विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सात प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. जायकवाडीत ९१.६८ टक्के इतका जलसाठा सध्या शिल्लक आहे. त्यानंतर मनारमध्ये २४.३० टक्के, विष्णुपुरीमध्ये २१.८६ टक्के, तर पेनगंगामध्ये १४.८५ टक्के पाणीसाठा आहे. सीना कोळेगाव, मांजरा, माजलगाव, सिद्धेश्वर, येलदरी, निम्न दुधना हे प्रकल्प मृतसाठ्यातच आहेत. विभागात ९२ टक्क्यांच्या आसपास खरीप हंगामात पेरणी झाली आहे. आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे पेरणी क्षेत्र ८ टक्क्यांनी वाढले. गेल्यावर्षी खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी ५0 टक्क्यांवर हंगामाचे उत्पादन घटले होते. दरम्यान, पुढील आठ दिवस विभागातील हवामान कोरडेच राहील, त्याचा परिणाम ढगाळ वातावरणावर होऊ शकतो, असे हवामानाचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. 

२२ लाख नागरिकांना टँकरचे पाणी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या विभागातील ९०६ गावे १५५ वाड्यांत राहणाऱ्या सुमारे २२ लाख ७१ हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. उर्वरित पावसाळ्यात पाऊस झाला नाही, तर विभागातील काही जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. 

आजवर मराठवाड्यातील जिल्ह्यांत झालेला पाऊस जिल्हा    वार्षिक    टक्केवारीऔरंगाबाद    ४७.५३जालना    ३९.४४परभणी    ३५.७७हिंगोली    ४२.९९नांदेड    ४९.५८बीड    २४.३०लातूर    ३४.७६उस्मानाबाद    ३२.०६एकूण    ३८.७८ टक्के

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद