शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळवाडा नव्हे मराठवाडा झाला ‘पाणीदार’; भूजल पातळीत १.७० मीटरने वाढ

By साहेबराव हिवराळे | Updated: November 12, 2022 18:35 IST

मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे.

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : सातत्याने दुष्काळाशी दोन हात करणारा मराठवाडा यंदा पाणीदार झाला असून, दमदार पर्जन्यवृष्टीमुळे विभागातील पाणीपातळीत सप्टेंबरमध्ये २.७१ मीटरने, तर पाच वर्षांच्या तुलनेत १.७० मीटरने वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत ८७५ निरीक्षण विहिरींच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आलेली आहे. यंदा पाणीटंचाई मराठवाड्याला भेडसावणार नसल्याचे मत भूजल विभागाने व्यक्त केले आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्याचे क्षेत्र अधिक असल्याने पाण्याचे सिंचन होत नाही, त्यामुळे उतरावर शेती असलेल्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात प्रत्येक गावात किंवा चार ते पाच गावे मिळून सिंचनावर अधिक काम होणे गरजेचे आहे. यंदा सातत्याने पावसाचे हजेरी लावल्याने मराठवाड्यात भूजल पातळी २.७१ ते १.७० मीटरने वाढली आहे. दरवर्षीच ‘दुष्काळवाडा’ म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा यंदा पाणीदार झाला आहे. पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे, पिके वाहून गेल्याचे चित्र ताजे आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे टँकरच्या फेऱ्याला ब्रेक लागणार आहे.

मराठवाड्यातील भूजल पातळीजिल्हा.......निरीक्षण विहिरी....पाणी पातळीतील वाढऔरंगाबाद.........१४१...................१.६०जालना.............११०...................१.८०परभणी.............८६....................३.२२हिंगोली.............५५....................०.७५नांदेड...............१३४...................२.१४लातूर...............१०९...................१.३५उस्मानाबाद........११४...................१.६९बीड..................१२६...................१.६२एकूण................८७५....................१.७०(पाणी पातळी मीटरमध्ये)

सर्व तालुक्यांत भूजल पातळीत वाढ८७५ निरीक्षण विहिरीतील पाणी पातळी मोजली असता मराठवाड्यात यंदा पाच वर्षांच्या तुलनेत १.७० मीटरने पाणी पातळी वाढली आहे. विभागातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुके असून, त्यातील प्रत्येक तालुक्यातील पाणी पातळी पाच वर्षांच्या तुलनेत वाढलेली असल्याने गावातील व शेतातील पाणीप्रश्न यंदा भेडसावणार नाही, असे मानले जाते.

सिंचन वाढविण्याची गरजसरासरीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर निरीक्षण विहिरींची तपासणी केली असता त्यात मराठवाड्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. उतारावरील पाणी वाहून न जाता त्याचे सिंचन वाढविण्याची गरज आहे.- भीमराव मेश्राम, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, औरंगाबाद

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद