बीडमध्ये मराठा क्रांतीचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:18 IST2017-08-06T00:40:00+5:302017-08-08T11:18:57+5:30

हातात भगवे झेंडे.. डोक्याला ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रुमाल आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष यामुळे शहर दणाणून गेले.

 The Maratha Revolution! | बीडमध्ये मराठा क्रांतीचा जयघोष

बीडमध्ये मराठा क्रांतीचा जयघोष

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : हातात भगवे झेंडे.. डोक्याला ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रुमाल आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष यामुळे शहर दणाणून गेले. निमित्त होते ९ आॅगस्ट रोजी मुंबईत होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीपर दुचाकी रॅलीचे. तोच उत्साह आणि तीच शिस्त पुन्हा एकदा बीडकरांना अनुभवयास मिळाली. हजारो समाजबांधवांनी या रॅलीत सहभाग नोंदवून ‘चलो मुंबई’ असे आवाहन केले. महिला, युवतींचीही या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभर सकल मराठा समाजाच्यावतीने मुक मोर्चे काढण्यात आले. बीडमध्येही मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये लाखो समाजबांधवांनी सहभाग नोंदवून हा मोर्चा जिल्ह्यातील ऐतिहासिक बनविला होता. त्यावेळेसच्या मोर्चात जी शिस्त आणि उत्साह होता, तोच शनिवारी निघालेल्या दुचाकी रॅलीतही पहावयास मिळाला.
दरम्यान, ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चा संदर्भात जनजागृती व नियोजनासाठी गावागावात बैठका घेतल्या जात आहेत. तसेच दुचाकी रॅली काढून मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे.
लक्षवेधी वेशभूषा
रॅलीसमोर असलेल्या जीपमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता. बाजूलाच लहान मुलासह युवतींनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. हेच रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.

Web Title:  The Maratha Revolution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.