शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फेसबुकवर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 11:26 IST

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.

औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक समाज बांधव आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. औरंगाबादमध्येही आज अशीच एक घटना समोर आली असून मुकुंदवाडी परिसरात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुकुंदवाडी रेल्वे गेट क्रमांक 51 येथे रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा प्रकार कळताच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी बंदची हाक दिली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याची माहिती फेसबुकवर जाहीर केली होती.

प्रमोद पाटील हा तरुण मराठा समाजातून येत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षणा नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता, अशी माहिती मिळते. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी (29 जुलै) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी करा… मराठा आरक्षणासाठी करा जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील…’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट 4.50 वाजता पोस्ट करत त्यात मराठा आरक्षण जीव जाणार असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. अखेर मध्य रात्री मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मुकुंदवाडीतील, रास्ता रोको,  बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. औरंगाबाद- जालना मार्ग बंद झाला आहे. या भागातील वातावरण तणावपूर्ण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

जालना व बीड कडे जाणारी वाहतूक प्रभावित 

सिडको बस स्थानकापासून पुढे जालना आणि बीडकडे जाणारी वाहतूक मुकुंदवाडी येथील रास्तारोकोमुळे प्रभावित झाली आहे. पोलिसांनी शहरातील एपीआय कॉर्नर येथून वाहतूक वळवली आहे. तसेच जालना रोडवर करमाड येथे वाहने थांबविण्यात आले आहेत. या ठिकाणी ४ बस पोलिसांनी रोखून धरल्या आहेत. बीडबायपास केंब्रीज स्कूलमार्गे शहरात येणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे (३८) याने रविवारी (29 जुलै) दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या निषेधार्थ भोकरफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. माहिती मिळताच तहसीलदार डॉ़अरविंद नरसीकर, पोलीस तसेच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़ कचरू हा सुशिक्षित होता. तो हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करायचा. त्याच्या पश्चात तीन मुली, पत्नी व वयोवृद्ध आई असा परिवार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादFacebookफेसबुक