शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : संवैधानिक खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी झाली पाहिजे; राज्य सरकारची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:32 IST

Maratha Reservation News : न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपिवले होते.

औरंगाबाद - मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेल्या नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाऐवजी संवैधानिक खंडपीठाचे गठन करून तिथे मराठा आरक्षणावर सुनावणी झाली पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे vअशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयात उद्या मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपिवले होते. मात्र उद्याची सुनावणी न्या. नागेश्वर राव यांच्याच खंडपीठापुढे होणार असल्याने उद्या काय होणार, याबाबत कमालीची उत्कंठा लागून आहे. यासंदर्भात चव्हाण म्हणाले की, या प्रकरणाची सुनावणी आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे नको तर आपणच दिलेल्या आदेशानुसार पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी सरकार करणार आहे. विविध संघटना आणि नेते यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असे  वाटते का, असे विचारता ते म्हणाले की, कुणाला काय भाष्य करायचे ते करू द्या. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून सरकारने जी जबाबदारी माझ्यावर टाकली, ती मी पार पाडणार, जे जे करणे आवश्यक आहे ते मी करणार. भाजप नेते नारायण राणे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर चव्हाण म्हणाले, त्यांच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. कारण हल्ली त्यांची टीका दखल घेण्यासारखी नसते. 

मराठा समाजाच्या विविध ७२ संघटनांशी माझी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक वेळा चर्चा झाली. ती चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत करून देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आताही आमची तीच भूमिका आहे.     - अशाेक चव्हाण,     सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAshok Chavanअशोक चव्हाण