मुंबईतील मोर्चासाठी निघाला ‘लाख मराठा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:45 IST2017-08-08T00:45:21+5:302017-08-08T00:45:21+5:30
मुंबईत ९ आॅगस्ट रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी सोमवारपासूनच मराठवाड्याच्या कानाकोपºयातील लाखो लोक रवाना होण्यास प्रारंभ झाला.

मुंबईतील मोर्चासाठी निघाला ‘लाख मराठा’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबईत ९ आॅगस्ट रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी सोमवारपासूनच मराठवाड्याच्या कानाकोपºयातील लाखो लोक रवाना होण्यास प्रारंभ झाला. विशेष म्हणजे प्रत्येक गाव आणि शहरातील वॉर्डा-वॉर्डातील मराठा बांधव आणि भगिनींनी स्वत:ची आणि भाड्याने वाहने घेऊन मुंबई मोर्चाची तयारी आठ दिवसांपूर्वीच केली.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येत आहे. कोपर्डीतील पीडितेला न्याय द्यावा, शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामूकमोर्चा शिस्तीत व्हावा यासाठी क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी नियोजन केले. वाहन पार्किंगपासून ते राज्यभरातून येणाºया प्रत्येक नागरिकाला मोर्चात विनाअडथळा सहभागी होता यावे यासाठी विविध ठिकाणी स्वयंसेवक नियुक्त केले. औरंगाबादेतील स्वयंसेवक रक्षाबंधन क रून स्वत:च्या वाहनाने सोमवारीच मुंबईला रवाना झाले. काही रेल्वेने, तर काही जण एस.टी. बसने जात होते. काही रात्री, तर काही मंगळवारी निघणार आहेत.
मराठा समाजातील छावा, अखिल भारतीय छावा, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या मराठा पदाधिकाºयांनी मोर्चाच्या समन्वयकाची भूमिका बजावली आहे.