शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांतीमोर्चाचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:24 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपचे पुर्व मतदार संघाचे आ.अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयावर दोन तासांहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले.

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपचे पुर्व मतदार संघाचे आ.अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयावर दोन तासांहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले. सरकारविरोधात आणि आ.सावे यांच्या विरोधात घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाने परिसर दणाणून सोडला. थाळी वाजवून महिला व कार्यकर्त्यांनी ठिय्या करीत घोषणा दिल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्यासह पदाधिकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. 

भाजपचे मराठा समाजाचे नगरसेवक आणि पदाधिकारी देखील ‘एक मराठा लाख मराठा’ च्या टोप्या घालून आंदोलनात सहभागी झाले होते. नगरसेवक शिवाजी दांडगे, रामेश्वर दसपुते, अशोक काळे, अर्जुन गवारेंची यावेळी उपस्थिती होती. मराठा क्रांती मोर्चाचे संतोष काळे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले, वारंवार सरकाराला निवेदन दिले. समाजातील १३ बांधवांनी आरक्षण व इतर मागण्यांसाठी बलिदान दिले. आ.सावे यांनी समाजाच्या मागण्या विधीमंडळात मांडून समाजाला आरक्षण देण्याची आग्रही भूमिका मांडली पाहिजे. 

आंदोलनात शैलेश भिसे, किशोर चव्हाण, रवींद्र काळे, सुनील कोटकर, ईश्वर चव्हाण, रमेश गायकवाड, राजाराम मोरे, सुनील देशमुख, मुकेश सोनवणे, सचिन मिसाळ, अमोल जाधव, अशोक वाघ, संजय सोमवंशी आदींसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होता. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भारत काकडे यांच्यासह पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी आंदोलनस्थळी प्रचंड बंदोबस्त लावला होता. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन