ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा निघणार मराठा क्रांती मोर्चा, कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी

By राम शिनगारे | Published: July 23, 2023 08:38 PM2023-07-23T20:38:59+5:302023-07-23T20:39:10+5:30

विद्यार्थ्याी घेणार पुढाकार, बैठकीतील निर्णय

Maratha Kranti Morcha to start again on August Revolution Day, demand for Kunbi certificate | ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा निघणार मराठा क्रांती मोर्चा, कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी

ऑगस्ट क्रांती दिनी पुन्हा निघणार मराठा क्रांती मोर्चा, कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात ९ ऑगस्ट २०१६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथूनच झाली होती. पुढे त्याचे लोण राज्यभरात पसरले. त्याच छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची एकमेव मागणी करीत पुन्हा एकदा ९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय दरम्यान माेर्चा काढणार आहेत. याविषयीचा निर्णय मराठा आरक्षण विद्यार्थी जनआंदोलन समितीच्या बैठक घेण्यात आला आहे.

म्हाडा कॉलनी येथील जिजाऊ मंदिर येथे मराठा विद्यार्थी मोर्चातर्फे रविवारी सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मराठा आरक्षण हे न्यायालयात आडकले नसून, राजकीय इच्छाशक्तीमुळे आडकले आहे. मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात मराठा समाज हा कुणबी म्हणून गणला जातो. मराठा व कुणबी एकच असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. गायकवाड आयोगाने मराठा समाजाचे समाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध केले आहे. त्यामुळे आरक्षण देण्याची कृती ही राज्य शासनाचे असते. मात्र, शासनाने आतापर्यंत मराठा समाजाला गृहीत धरले आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षणाचा प्रश्नच कायमस्वरुपी निकाली निघतो, अशी मांडणी विविध तज्ज्ञांनी आकडेवारीसह केली. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य डॉ. राजेश करपे, सांख्यकिय तज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. विलास खंदारे, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. ललित अधाने, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गितांजली बोराडे, ॲड. आकाश गाढे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

असा असेल कृती कार्यक्रम

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय न घेतल्यास सर्वच राजकीय पक्ष आरक्षणविरोधी असल्याची जनजागृती मराठा विद्यार्थी मोर्चा गावोगावी जाऊन करणार असल्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

विद्यार्थी राहणार केंद्रस्थानी

९ ऑगस्टच्या क्रांती मोर्चात विद्यार्थी केंद्रस्थानी असणार आहेत. त्याचवेळी विद्यार्थ्यांचे पालक म्हणून समाजातील मान्यवर पाठीशी राहतील असेही यावेळी ठरविण्यात आले. या बैठकीला ज्येष्ठ साहित्यीक बाबा भांड, डॉ. राम चव्हाण, डॉ. भास्कर साठे, डॉ. कृतिका खंदारे यांच्यासह समाजातील प्राध्यापक, वकील, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Maratha Kranti Morcha to start again on August Revolution Day, demand for Kunbi certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.