शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

‘नकाशातील’ अडचणी कायम!

By admin | Updated: July 28, 2014 01:05 IST

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल २०१५ मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असून, सध्या ‘नकाशा’ तयार करण्यात अडचणी कायम आहेत. नकाशाचे किती काम झाले.

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल २०१५ मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असून, सध्या ‘नकाशा’ तयार करण्यात अडचणी कायम आहेत. नकाशाचे किती काम झाले. किती ठिकाणी अडचणी आहेत. त्याबाबत मनपाने काय भूमिका घ्यावी. यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य उद्या २८ रोजी शहरात येणारआहेत. दोन सदस्यांची टीम पालिकेला प्रभाग पद्धतीप्रकरणी मार्गदर्शन करील. आजवर नकाशाचे किती टक्के काम झाले आहे. याची माहिती त्या सदस्यांना देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नकाशाची ही जुळवणी करताना १५ वार्डांच्या हद्दीची अडचण निर्माण झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी आहे. शिवसेना प्रभाग रचनेच्या विरोधात आहे. २४ आॅक्टोबर २००५ च्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागरचना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर बंधने आहेत, तसेच संबंधित मतदारसंघ, वॉर्ड रचनेची माहिती कोणत्याही नागरिकाला अधिकारात मागविता येणार नाही. मागितली १ महिन्याची मुदत२००५ मध्ये करण्यात आलेल्या वॉर्ड नकाशातील दिशादर्शक खूण (वॉर्ड हद्दीची खूण) २०१४ मध्ये सापडत नाही. त्यामुळे मनपाने निवडणूक आयोगाकडून नकाशे तयार करण्यासाठी १ महिन्याची मुदत वाढवून मागविल्याचे सूत्रांनी सांगितले. जुन्या प्रभाग रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे, झाडांच्या खुणा गायब झाल्यामुळे प्रभागांचे नकाशे तयार करण्यात अडचणी आहेत. १८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ११४ प्रभाग होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला. इच्छुकांचे दबावतंत्र जनगणनेसाठी प्रगणकांना २ हजार लोकसंख्येचा एक ब्लॉक असून, त्या ब्लॉकआधारेच नकाशे असतील. ब्लॉकमध्ये हेराफेरी झाल्यास प्रभाग रचनेत पाहिजे त्या मतदारांचा गट समाविष्ट केला जाऊ शकतो. ही बाब २०१५ मध्ये निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक, विद्यमानांनी हेरली असून, त्यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. आकडेवारीनुसार शहरात १२ प्रभाग एस.सी., एस.टी.साठी आरक्षित होतील, असा अंदाज आहे. त्यात सहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित होतील. १२ प्रभाग म्हणजे २४ वॉर्ड होऊ शकतात. सध्या एस.सी.साठी १७ व एस.टी.साठी १ वॉर्ड असमान आणखी ६ वॉर्ड वाढू शकतात, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.१५ वॉर्डांच्या हद्दीचा खोळंबा नकाशाची जुळवणी करताना सुमारे १५ वॉर्डांच्या विद्यमान हद्दीची अडचण निर्माण झाली आहे. जातीनिहाय मतदारांचा आकडा २०११ च्या जनगणनेनुसार निश्चित होणार आहे.