लासूरगावासह अनेक खेडे एसटीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:25+5:302021-02-05T04:09:25+5:30
औरंगाबाद जिल्ह्याचे कुलदैवत श्री देवी दाक्षायणी मातेचे मोठे व पुरातन मंदिर लासूरगावला आहे. तेथे दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला ...

लासूरगावासह अनेक खेडे एसटीपासून वंचित
औरंगाबाद जिल्ह्याचे कुलदैवत श्री देवी दाक्षायणी मातेचे मोठे व पुरातन मंदिर लासूरगावला आहे. तेथे दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला भाविकांची मोठी गर्दी होते. औरंगाबाद जिल्ह्याच्या व राज्याच्या अनेक भागातून येथे भाविक येतात. मात्र औरंगाबाद जिल्ह्याच्या एकाही आगारातून लासूरगावासाठी एकही बस नाही. पूर्वी लासूरगावासाठी वैजापूर आगारातून रोज चार बस फेऱ्या होत होत्या. मात्र सध्या त्याही बंद असल्याने लासूरगाववासीयांना वैजापूर या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी खाजगी प्रवासी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील हडस पिंपळगाव, शहाजपूर, जळगाव, राहेगाव, सोनवाडी, राजूरा, भायगाव आदी गावांमध्येही एसटीची बस सेवा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. महामंडळाने या गावांमध्ये बस सेवा सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.