पालिकेत अनेकांना लागली लॉटरी

By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:42:51+5:302014-09-04T00:54:43+5:30

औरंगाबाद : महापालिकेत आज अनेक निलंबित, रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांची लॉटरी लागली आहे. पदभार सोडण्यापूर्वी डॉ.कांबळे यांनी कुणालाही नाराज केले नाही.

Many people in the lottery | पालिकेत अनेकांना लागली लॉटरी

पालिकेत अनेकांना लागली लॉटरी

औरंगाबाद : महापालिकेत आज अनेक निलंबित, रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांची लॉटरी लागली आहे. पदभार सोडण्यापूर्वी डॉ.कांबळे यांनी कुणालाही नाराज केले नाही. लेखा विभागातील काही पदांव्यतिरिक्त त्यांनी चार ते पाच पदांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे कळते.
आयुक्त महाजन यांना पदभार दिल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी डॉ.कांबळे बंगल्यावर येताच त्यांच्या मागेच सभागृह नेते किशोर नागरे यांच्यासह काही नगरसेवक आले, तसेच उपअभियंता शिरीष रामटेके हे देखील काही महत्त्वाच्या संचिका घेऊन आले. आयुक्तांचे स्वीय सहायक हनुमानदास बाहेती, सुरेश ढेंगळे हे देखील बंगल्यावर होते. १३ सप्टेंबर रोजी डॉ.कांबळे निवासस्थान रिक्त करून देण्यासाठी येणार आहेत. तोपर्यंत नवनियुक्त आयुक्त महाजन हे देखील धुळ्याहून सहकुटुंब परततील.
अनेकांना दिले प्रमोशन
डॉ.कांबळे यांनी पदभार सोडण्यापूर्वी अनेकांना प्रमोशन दिले. यामध्ये जयंत खरवडकर यांच्याकडे गुंठेवारी कक्षप्रमुख, आर.एन.संधा यांना भोगवटा कक्षप्रमुख, तर डॉ.जयश्री कुलकर्णी यांच्याकडे आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर निलंबित इमारत निरीक्षक सारंग विधाते यांचे निलंबन मागे घेतल्याची चर्चा आहे. शिरीष रामटेके, पी.आर.बनसोडे यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नत केल्याची चर्चा आहे. डॉ.कुलकर्णी यांना पुन्हा आरोग्य अधिकारी या पदावर कायम केले आहे. या प्रकरणात चार सदस्यीय समितीही गठित करण्यात आली आहे.
बदल्यांमुळे चर्चेत
तत्कालीन आयुक्त डॉ. भापकर हे कर्मचारी, अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यावरून चर्चेत राहिले, तर डॉ. कांबळे हे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून चर्चेत राहिले. ते ज्या-ज्या वेळी मुंबई, दिल्लीला प्रशासकीय बैठकीनिमित्त जात, त्या-त्या वेळी अनेक विभागात खांदेपालट करीत असत.

Web Title: Many people in the lottery