शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मिल्क पावडर, डालडा अन् पामतेलाच्या मिश्रणातून बनावट खव्याची निर्मिती, कारखान्यावर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 14:18 IST

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर शहरात लाखो रुपयांचा धोकेदायक भेसळयुक्त खवा जप्त; पूर्वी कारवाई झालेल्या कारखान्यात पुन्हा भेसळयुक्त खव्याची निर्मिती सुरू झाली होती.

छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळीत मिटमिटा भागात धोकेदायक पद्धतीने भेसळयुक्त धोकादायक खवा तयार करणारा कारखाना उघडकीस आला आहे. बुधवारी सायबर पोलिसांच्या पथकाने गिरेन सिंग बच्चनलाल सिंग याच्या ‘दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रॉडक्ट’वर छापा टाकून जवळपास ६ क्विंटल बनावट खव्याचे साहित्य जप्त केल्याचे सायबर ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त शहरात नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत आहेत. लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या बाजारपेठेत मात्र मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा खवाच बनावट वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी याबाबत कारवाईच्या सूचना केल्यानंतर तपासादरम्यान मिटमिटाच्या उस्मानिया कॉलनीत ‘दिव्यांश मिल्क अँड डेअरी’त भेसळयुक्त खवा, अन्य मिठाई तयार होत असल्याची माहिती पांढरे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी पथकासह कारखान्यावर छापा मारला. तेव्हा तिथे अस्वच्छ ड्रम व भांड्यांमध्ये खवा तयार करणे सुरू होते.

उत्तर प्रदेशवरून मिल्क पावडरगिरेन उत्तर प्रदेशवरून कमी किमतीत मिल्क पावडर आणतो. उकळत्या पाण्यात डालडा, पामतेल, पाणी, खाता सोडा मिसळून ड्रममध्ये झटपट मोठ्या प्रमाणावर खवा तयार केला जात होता. उपनिरीक्षक संदीप शिंदे, सागर पाटील, अंमलदार अशरफ सय्यद, विनोद परदेशी, रंजक सोनवणे, सुनील जाधव, सुधीर मोरे, सुधीर मोरे, सतीश हंबर्डे, राजाराम वाघ, सुनील बेलकर, अजय दहिवाळ, प्रमोद सुरसे, सोहेल पठाण यांनी कारवाई केली.

यापूर्वी कारवाई, तरीहीगिरेनवर गेल्यावर्षीच गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली होती. छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी त्याच्यावर गुन्हादेखील दाखल आहे. तरीही त्याने त्याच परिसरात पुन्हा कारखाना उघडला. त्याच्या कारखान्यातून ४२५ किलो बनावट खवा जप्त करण्यात आला. शिवाय १५० किलो बनावट साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध मिठाईदेखील आढळून आल्या; परंतु त्याला बनावट ग्राह्य धरण्यास अन्न व औषध प्रशासन विभागाने नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfood poisoningअन्नातून विषबाधाCrime Newsगुन्हेगारी