शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मनपा लेखा विभागात लवकरच फेरबदल

By admin | Updated: September 17, 2014 01:16 IST

औरंगाबाद : महापालिका लेखा विभागात लवकरच काही कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे संकेत आयुक्त प्रकाश महाजन यांनी आज दिले.

औरंगाबाद : महापालिका लेखा विभागात लवकरच काही कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे संकेत आयुक्त प्रकाश महाजन यांनी आज दिले. लोकमतने मंगळवारच्या अंकात लेखा विभागातील अनागोंदी स्टिंग आॅपरेशन करून चव्हाट्यावर आणली. ज्या कर्मचाऱ्यांवर अफरातफरीचे गुन्हे दाखल झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या आठवड्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये धनादेशावरून तीन वेळा हाणामाऱ्या, वाद होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांना आयुक्तांनी गंभीरतेने घेतले आहे. पर्यायी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लेखा विभागात पाठविण्यात येईल. जे मागील दहा- दहा वर्षांपासून त्या विभागात ठाण मांडून बसले आहेत. त्यांची बदली करण्याबाबतही प्रशासनाने विचार सुरू केला आहे. लेखा विभागातून सध्या मर्जीतील बड्या कंत्राटदारांचे धनादेश देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लहान व किरकोळ कंत्राटदारांना कुणीही वाली नसल्यासारखे झाले आहे. त्यातूनच अधिकारी व कंत्राटदारांमध्ये हाणामारी होण्यापर्यंत मजल गेली आहे. कंत्राटदारांना कोणत्या प्राधान्याने धनादेश दिले जातात, त्याचे बिंग लोकमतने फोडल्यानंतर पालिकेत एकच खळबळ उडाली. दरम्यान लेखाधिकारी संजय पवार म्हणाले, माझा कुणाबरोबरही वाद झालेला नाही. कुणीतरी मुद्दामहून असे प्रकार पुढे आणू पाहत आहे. मंगळवारीदेखील कुठल्याही कंत्राटदाराबरोबर माझा वाद झालेला नाही. हे सगळे कोण करते आहे, कशासाठी करते आहे, हे कळण्यास मार्ग नाही. मंगळवारच्या ‘औरंगाबाद हॅलो’मध्ये लोकमतने प्रकाशित केलेले मर्जीतील ठेकेदारांना मेवा हेच ते वृत्त.पालिकेची फुटकळ कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी आयुक्त महाजन यांना निवेदन देऊन लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. त्या तक्रारीबाबत आयुक्तांनी विचार सुरू केला आहे. लेखा विभागात मंगळवारी एका कंत्राटदाराने बिलासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. पालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कंत्राटदार पैसे मागण्यासाठी येत आहेत. फुटकळ कामे करणाऱ्या कंत्राटदारांची बिले मनपाने तातडीने अदा न केल्यास आगामी काळात आणखी उद्रेक होण्याची शक्यता आहे.