भरदिवसा लुटले महिलेचे मंगळसूत्र
By Admin | Updated: October 15, 2016 01:22 IST2016-10-15T01:12:26+5:302016-10-15T01:22:28+5:30
औरंगाबाद : धम्मयान एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल फॉर सोशल अँड कल्चरल रिलेशनशिप या कार्यक्रमामुळे

भरदिवसा लुटले महिलेचे मंगळसूत्र
औरंगाबाद : धम्मयान एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल फॉर सोशल अँड कल्चरल रिलेशनशिप या कार्यक्रमामुळे औरंगाबाद शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू या कार्यक्रमाला उपस्थित होते. इंग्रजी आणि मराठी या भाषांमधून बौद्ध धम्माची शिकवण आणि प्रसार यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भिक्खूंनी प्रकाश टाकला.
शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाची सुरुवात पवित्र धम्म ध्वजारोहणाने करण्यात आली. शहानूरमियाँ दर्गा परिसर-संग्रामनगर पुलाजवळील जबिंदा इस्टेट परिसरातील मैदान यावेळी फुलांच्या व विविध रंगांच्या रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आले होते.
बौद्ध संस्कृती आणि परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक शहरात यानिमित्ताने पहिल्यांदा इंटरनॅशनल फेस्टिव्हल होत असल्याचे जाहीर करण्यात आले. धम्म ध्वजारोहणाच्या वेळी देश-विदेशातील पूज्य भिक्खू संघ, विद्वान, प्रमुख राज्याच्या नायकांची उपस्थिती होती. यात पू. भिक्खू एम.धम्मज्योती थेरो, आ. संजय शिरसाट, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, श्रीलंका, कोरिया, तिबेट येथील भिक्खू उपस्थित होते.
जबिंदा इस्टेट परिसरात यावेळी पुस्तक, बुद्धमूर्ती आणि आंबेडकरी साहित्याची सुमारे २५ दुकाने थाटण्यात आली होती. यावेळी अनुयायांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. या पूर्ण कार्यक्रमासाठी २५ ते ३० लाख रुपयांपर्यंतचा खर्च झाला.
विविध धार्मिक कार्यक्रम
त्रिशरण, पंचशील, परित्राण पाठ आणि भिक्खू संघाची धम्मदेसना याप्रसंगी करण्यात आली. यावेळी आ. शिरसाट यांनी व्यासपीठावर सर्व भिक्खूंचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. समता मंचच्या पुरुष व महिला स्वयंसेवकांनी यावेळी व्यासपीठावर जाऊन वंदना केली. भिक्खू संघाचे भोजनदान व्यवस्था आ. शिरसाट आणि सिद्धार्थ शिरसाट, नागराज गायकवाड यांनी पाहिली. गायक राजाभाऊ शिरसाट यांच्या भीमा तुझ्या जन्मामुळे हा भीमगीतांचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात झाला. भीमगीतांनी रसिकांना आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शहरातील विविध महाविद्यालयांतून उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. या कार्यक्रमात कुठेही अनुचित प्रकार घडू नये. गर्दी नियंत्रणासाठी त्यांनी पोलिसांना मदत केली.
पाली विद्यापीठाची मागणी
या फेस्टिव्हलमध्ये औरंगाबादेत पाली भाषेचे विद्यापीठ सुरू करण्याची मागणी आ. शिरसाट यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे पाली भाषेचे सेंटर विद्यापीठात आहे. पाली भाषेने मोठे साहित्य दिले असून, ती भाषा जगली पाहिजे. येथील सेंटर मोठे करायचे की विद्यापीठ करायचे, याबाबत लवकरच व्यापक बैठक घेण्यात येईल.
नऊ मान्यवरांना पुरस्कार
या महोत्सवात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या धम्म बांधवांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी मंत्री गंगाधर गाडे, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, सिरी सिद्धार्थ या चित्रपटातील मुख्य अभिनेता गगन मलिक, अभिनेत्री आंचल सिंग, अंशू मलिक, ‘सैराट’ चित्रपटाचे कलादिग्दर्शक संतोष शंकर, स्वदेशी विमान निर्मिती तंत्रज्ञान करणारे कॅप्टन अमोल यादव, अशोक आठवले आणि अविनाश कांबळे यांना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
दिवसभराच्या या कार्यक्रमात अभिनेता गगन मलिक, अभिनेत्री आंचल सिंग, अंशू मलिक, कॅप्टन अमोल यादव, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे, गंगाधर गाडे, मनोज संसारे, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आदींची भाषणे झाली. तथापि, सकाळी तिबेटचे पूज्यनीय लामा लोब्जोंग यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भदन्त धम्मज्योती थेरो यांनी केले. सूत्रसंचालन राजाभाऊ शिरसाट यांनी केले. या कार्यक्रमास ३० ते ४० हजार बौद्ध उपासक - उपासिकांची उपस्थिती होती.