साताऱ्यात मनपाची फसगत
By Admin | Updated: December 31, 2015 00:55 IST2015-12-31T00:52:35+5:302015-12-31T00:55:55+5:30
औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसर अधिकृतरीत्या मनपाकडे वर्ग झालेला नसताना मनपाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये विकासकामांवर खर्च केले.

साताऱ्यात मनपाची फसगत
कोट्यवधींचा खर्च : ४३ कर्मचारी परत पाठविणार
औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसर अधिकृतरीत्या मनपाकडे वर्ग झालेला नसताना मनपाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये विकासकामांवर खर्च केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्यानंतर मनपाची कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. नगर परिषदेकडून ४३ कर्मचारी मनपा आस्थापनेवर घेण्यात आले होते. त्यांना परत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
सातारा- देवळाईत नगर परिषद करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. शासनाने युद्धपातळीवर नगर परिषद घोषित केली. नगर परिषदेची निवडणूकही जाहीर करण्यात आली. त्यानंतर शासनाने सातारा-देवळाईचा संपूर्ण परिसर मनपात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नगर परिषद का, मनपा, असा वाद सुरू आहे.
दरम्यान, १८ मे २०१५ रोजी सातारा नगर परिषदेतील तब्बल ४३ कर्मचारी मनपाच्या आस्थापनेवर घेतले. त्यांचा पगारही मनपाने सुरू केला. कायदेशीररीत्या सातारा-देवळाई हा परिसर मनपाकडे नाही. त्यामुळे आतापर्यंत विविध विकासकामांवर