दोन कर्मचार्‍यावर पोस्टाचा कारभार

By Admin | Updated: May 8, 2014 00:53 IST2014-05-08T00:53:39+5:302014-05-08T00:53:52+5:30

पूर्णा: शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार तर ग्रामीण भागाचा वाढता विस्तार या तुलनेत जुन्या मानकाप्रमाणे पोस्ट कार्यालयातील कर्मचार्‍यांची संख्या कमी पडत आहेत

Manage posts on two employees | दोन कर्मचार्‍यावर पोस्टाचा कारभार

दोन कर्मचार्‍यावर पोस्टाचा कारभार

 पूर्णा: शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार तर ग्रामीण भागाचा वाढता विस्तार या तुलनेत जुन्या मानकाप्रमाणे पोस्ट कार्यालयातील कर्मचार्‍यांची संख्या कमी पडत असून केवळ दोन कंत्राटदारी पोस्टमनवरच पूर्णा पोस्ट कार्यालयाचे व्यवहार चालतात. महसूल खात्याशी सलग्नीत असणार्‍या या कार्यालयामार्फत दररोज लाखोंचा व्यवहार चालतो. दोन लिपीक, एक पोस्ट मास्टर व दोन तात्पुरत्या स्वरुपाच्या पोस्टमनमुळे कार्यालयातील कारभार पूर्णत: कोलमडला आहे. पोस्टांच्या बॅगा, तिकीटे व साहित्यांची विक्री, स्पीड पोस्ट, रजिस्ट्री, पार्सल, मनिआॅर्डर तथा सेव्हिंग बाबतच्या कार्यालयातील कामात अर्धे कर्मचारी व्यस्त असतात. ग्रामीण डाक सेवेबाबत ही उदासिनता असून एकाच कर्मचार्‍यावर अनेक ठिकाणी कामे करावी लागतात. आॅन लाईन बॅकींग झाल्यामुळे काही व्यवहार कमी झाले असले तरी शासकीय कागदपत्रे एटीएम कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स आदी महत्वाची कागदपत्रे याच कार्यालयावर निर्भर आहेत. तालुक्यातील निळा व एरंडेश्वर येथील पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तालुक्याअंतर्गत १० शाखा आहेत. याशिवाय याच कार्यालयावर पालम तालुक्यातील गुंज, राहटी, भोगाव या गावांचे व्यवहार पूर्णा पोस्ट खात्यांतर्गतच चालतात. गेल्या अनेक वर्षांपासून पदांच्या अनियमितता यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर पूर्णा पोस्ट कार्यालयात कायमस्वरुपी दोन पोस्टमनच्या जागा भरण्याची गरज आहे.(प्रतिनिधी) एकच खिडकी कर्मचार्‍यांअभावी पोस्ट आॅफीसच्या एका खिडकीतून साहित्य विक्री केले जाते. तर इतर सुविधांसाठी त्याच खिडकीचा वापर करावा लागतो. परिणामत: ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे कर्मचार्‍यांवर ताण पडतो तर अनेकदा ग्राहकांसोबत कर्मचार्‍यांची हमरी-तुमरी होते.

Web Title: Manage posts on two employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.