औरंगाबादच्या शीरपेचात मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:52+5:302021-02-05T04:17:52+5:30
त्यांचा हा सन्मान औरंगाबादमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मित्रमंडळींसाठीही आनंदाचा उत्सव ठरला, अशी माहिती त्यांचे बालमित्र संदीप मालू यांनी 'लोकमत'शी बोलताना ...

औरंगाबादच्या शीरपेचात मानाचा तुरा
त्यांचा हा सन्मान औरंगाबादमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मित्रमंडळींसाठीही आनंदाचा उत्सव ठरला, अशी माहिती त्यांचे बालमित्र संदीप मालू यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. मनीष यांचे शालेय शिक्षण होलीक्रॉस इंग्लिश स्कूलमध्ये झाले असून, शासकीय कला, विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९९५ साली त्यांनी एअर फोर्समधील करिअरला सुरूवात केली.
'लोकमत'शी बोलताना संदीप मालू म्हणाले की, मनीष एअर फोर्समध्ये रूजू झाला होता, तोदेखील आम्हा सर्व मित्रमंडळींसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. तेव्हापासून आजपर्यंत नेहमीच मनीषने उत्कृष्ट कार्य करून आम्हाला अभिमानास्पद बातम्या दिल्या आहेत. मनीष हे लहानपणापासूनच अत्यंत ध्येयवादी, निष्ठेने काम कराणारे, एखादी गोष्ट ठरविली, की ती मिळवून दाखविणारे आहेत. मनीष यांच्या पत्नी गार्गी आणि मुलगी युक्ता यांची त्यांना नेहमीच खंबीर साथ असते, असेही मालू यांनी सांगितले.