मामा-मावशाकडून मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:59 IST2017-09-08T00:59:02+5:302017-09-08T00:59:02+5:30
आई-वडील नसलेल्या सहावीत शिकणाºया बालिकेवर तिचा मामा आणि मावशानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी एका शिक्षिकेमुळे उघडकीस आली.

मामा-मावशाकडून मुलीवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आई-वडील नसलेल्या सहावीत शिकणाºया बालिकेवर तिचा मामा आणि मावशानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी एका शिक्षिकेमुळे उघडकीस आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मुकुंदवाडी भागात राहणारा हा मावस काका आणि मामा यांना अटक झाली आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, ११ वर्षीय पीडितेच्या आई-वडिलांचे निधन झालेले आहे. यामुळे तिचा सांभाळ मुकुंदवाडीत राहणारी तिची मावशी आणि मावस काका करतात. मुलीचा मामा हासुद्धा दोन ते तीन वर्षांपासून मुकुंदवाडीत मावशीच्या घरीच राहतो. तो सेक्युरिटी गार्डचे काम करतो. पीडितेची मावशी ही एका खाजगी रुग्णालयात सफाईचे काम करते. आरोपी मावसा हा घरीच राहतो. दोन्ही आरोपींना दारूचे व्यसन आहे. पीडितेकडून ते घरची धुणीभांडी करून घेतात. काम न केल्यास ते तिला उपाशी ठेवतात. भीक मागून आण, असे म्हणतात. दोन्ही आरोपींनी दारूच्या नशेत वर्षभरापासून तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. एवढेच नव्हे तर या अत्याचाराची कोठेही वाच्यता केल्यास तुला घराबाहेर हाकलून देऊ, अशी धमकीही देत होते. ही बाब काही दिवसांपूर्वी तिने मावशीला सांगितली. मात्र, मावशीने उलट तिलाच याची कोठेही वाच्यता करू नको, असे बजावले. परिणामी दोन दिवसांपूर्वीच आरोपीने तिच्यावर अत्याचार
केला.
शिक्षिकेने कळविले पोलिसांना
गुरुवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जात होते. मात्र पीडिता ही वर्गातच बसून रडत होती. शिक्षिकेने तिला काय झाले याची विचारपूस केली. तेव्हा तिने घरी जाण्यास नकार देऊन शाळेतच राहू देण्याची विनंती केली. यावेळी अन्य शिक्षिकाही तेथे जमा झाल्या व त्यांनी आस्थेने तिची चौकशी केली. तेव्हा (पान २ वर)