कुपोषणाने कोमेजली भावी पिढी !
By Admin | Updated: July 11, 2014 00:58 IST2014-07-10T23:39:37+5:302014-07-11T00:58:03+5:30
संजय तिपाले , बीड कुपोषण निमुर्लनासाठी कसोशीचे प्रयत्न होत असताना त्याचा अपेक्षित ‘रिझल्ट’ काही मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़

कुपोषणाने कोमेजली भावी पिढी !
संजय तिपाले , बीड
कुपोषण निमुर्लनासाठी कसोशीचे प्रयत्न होत असताना त्याचा अपेक्षित ‘रिझल्ट’ काही मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ जिल्ह्यातील सुमारे २१०३ बालके कुपोषित असल्याचे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केलेल्या तपासणीतून पुढे आले आहे़ कुपोषणात गेवराई तालुका सर्वात पुढे असून भावी पिढी कोमेजून गेली आहे़ त्यामुळे कुपोषणाच्या नावाखाली नेमके कोणाचे ‘पोषण’ होतेयं? याचे कोडे कायम आहे़
१ एप्रिल २०१३ पासून केेंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कायक्रम राबविला जातो़ याअंतर्गत ० ते १८ वर्षेवयोगटातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते़ जून महिन्यात केलेल्या तपासणी दरम्यान जिल्ह्यात २ हजार १०३ बालके कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़ अतितीव्र बालकांची संख्या ४५३ इतकी आहे तर १६५० बालके मध्यम तीव्र कुपोषित आहेत़ गेवराई तालुक्यात सर्वाधिक कुपोषित बालके आहेत़ या तालुक्यात अतितीव्र कुपोषित बालकांचा आकडा १६९ इतका असून १६८ बालके मध्यम तीव्र कुपोषित आहेत़
बालस्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून तालुकानिहाय पथकांमार्फत तपासणी केली जाते अशी माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे पर्यवेक्षक रमेश तांगडे यांनी दिलीे़ १३ जुलै रोजी बीड येथे बालकांच्या फाटलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्व तपासणी शिबीर आयोजित केले आहे़ त्यासाठी ३८ बालकांची नोंदणी झाली असून तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत, असेही तांगडे म्हणाले़
तालुकाअतितीव्र मध्यमतीव्र
बीड७६९५
परळी१८०५
अंबाजोगाई९५२६७
माजलगाव२८७२
गेवराई१६९८०५
धारुर१२१२६
आष्टी४५१८८
केज३११६७
पाटोदा३५६९
वडवणी०५३२
शिरुर११२८
एकूण४५३१६५०
९४हजार ८८९ बालके ० ते ३ वयोगटातील असून त्यापैकी २५२ बालके अतितीव्र कुपोषित आहेत़
०१लाख १७ हजार ९५७ बलके ३ ते ६ वयोगटातील आहेत़ त्यापैकी २०१ बालके अतितीव्र आहेत़
०२लाख १२ हजार ८४६ बालकांची आरोग्य तपासणी बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे़