धडक मारून बेधडक हिसकावले मंगळसूत्र
By Admin | Updated: December 23, 2014 00:36 IST2014-12-23T00:36:57+5:302014-12-23T00:36:57+5:30
औरंगाबाद : ट्रिपल सीट आलेल्या दुचाकीस्वारांनी समोर असलेल्या दुचाकीला धडक मारली. त्यामुळे दुचाकीस्वार महिला खाली पडली

धडक मारून बेधडक हिसकावले मंगळसूत्र
औरंगाबाद : ट्रिपल सीट आलेल्या दुचाकीस्वारांनी समोर असलेल्या दुचाकीला धडक मारली. त्यामुळे दुचाकीस्वार महिला खाली पडली. त्याचक्षणी धडक मारणाऱ्या दुचाकीवरील एकाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ‘धूम’ ठोकली. ही घटना गजबजलेल्या जयभवानीनगर चौकात सोमवारी दुपारी तीन वाजता घडली.
मुकुंदवाडी परिसरातील जयभवानीनगरातील रहिवासी सविता सुनील भागवत (२८) ही महिला पती व दोन मुलांसह मोटारसायकलवर आपल्या गावी गेलेली होती. सोमवारी दुपारी हे कुटुंब मोटारसायकलवर बसून परत औरंगाबादला आले. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ते जयभवानीनगर चौकात पोहोचले. त्याचवेळी अचानक समोरून एका मोटारसायकलवर ट्रिपल सीट अनोळखी तरुण आले. या तरुणांनी दुचाकीने सरळ भागवत यांच्या दुचाकीला धडक मारली. भागवत दाम्पत्य खाली पडले. धडक देणाऱ्या दुचाकीवरील एक जण खाली उतरला. त्याने सविता भागवत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले आणि क्षणभरातच तो पुन्हा दुचाकीवर बसला आणि मग तिघे सुसाट वेगाने तेथून पसारही झाले.
विशेष म्हणजे त्यावेळी चौकात अनेक नागरिक उभे होते. अपघातानंतर काही जण तर मदतीसाठी धावलेही.