मलायका अरोराचा "हॉट" अंदाज व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:05 IST2020-12-22T04:05:56+5:302020-12-22T04:05:56+5:30

आपले सौंदर्य आणि फिटनेसने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी चर्चेत असते. मलायकाने नुकताच सोशल मीडियावर एक ...

Malaika Arora's "hot" prediction goes viral | मलायका अरोराचा "हॉट" अंदाज व्हायरल

मलायका अरोराचा "हॉट" अंदाज व्हायरल

आपले सौंदर्य आणि फिटनेसने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी चर्चेत असते. मलायकाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये मलायका व्हाइट बोल्ड टॉप आणि स्कर्टमध्ये असून अत्यंत मोहक दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने, ''हॅलो संडे, फक्त हसा आणि आनंदी रहा'' असे कॅप्शन दिले आहे. काही क्षणातच या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव सुरू झाला. एका चाहत्याने कमेंट केली की, कुणी इतके सेक्सी असू शकते. तर दुसरा चाहत्याने, तू भारतातील सर्वात सुंदर स्त्री आहेस अशी कमेंट केली असून हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

‘वापसी’च्या प्रश्नावर अमिषा पटेलची सटकली

गेल्या दीड वर्षांपासून अमिषा पटेल कोणत्याही सिनेमात झळकली नाही. अमिषाचे फिल्मी करिअर संपले, असे यामुळे तुम्ही म्हणत असाल तर ते चूक आहे. कारण अमिषा स्वत: हे मानायला तयार नाही. ‘२०१८ मध्ये मी सनी देओलसोबत एक सिनेमा केला होता. त्यामुळे उण्यापुऱ्या दीड वर्षांपासून मी सिनेमांपासून दूर आहे. इतका गॅप तर आमीर खान, शाहरूख खानही घेतात,’ असे आमिषाचे म्हणणे आहे. चित्रपटांपासून दूर राहून मी प्रॉडक्शनचे टेक्निक शिकले, असेही तिने सांगितले. अमिषाचा आगामी सिनेमा ‘देसी मॅजिक’ आहे. यात ती डबल रोलमध्ये दिसणार आहे. याशिवाय द ग्रेट इंडियन कसीनो आणि तोबा तेरा जलवा हे दोन सिनेमेही तिच्याजवळ आहेत.

Web Title: Malaika Arora's "hot" prediction goes viral