शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅट खरेदी करण्यासाठी नोकराने केला लुटीचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 19:14 IST

रिक्षाप्रवासादरम्यान दोन जणांनी  ३ लाख १० हजार रुपये किंमतीची सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची बॅग हिसकावून नेल्याचा बनाव  करणा-या नोकराला गुन्हेशाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली.

औरंगाबाद, दि. १६ : रिक्षाप्रवासादरम्यान दोन जणांनी  ३ लाख १० हजार रुपये किंमतीची सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची बॅग हिसकावून नेल्याचा बनाव  करणा-या नोकराला गुन्हेशाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली. फ्लॅट खरेदी करण्यासाठी हा बनाव केल्याची कबुली देत चोरलेला ऐवज पोलिसांना काढून दिला. गणेश नामदेव शेळके असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, दिवाण देवडी येथील जिगणेश भरतकुमार चंद्रनीस या व्यापा-याचे स्वामीनारायण गोल्ड पॅलेस हे दुकान आहे. यादुकानावर आरोपी हा नोकर म्हणून काम करायचा. शहरातील ज्वेलर्संना माल पुरवणे आणि त्यांच्याकडून पैसे आणण्याची जबाबदारी आरोपीवर होती. १५ सप्टेंबर रोजी त्याने सुमारे २ लाख ७०हजार रुपये किंमतीचे ९० ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि रोख ४० हजार रुपयांचा ऐवज आणण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. हा ऐवज हातात पडल्यानंतर त्याने तो हाडपण्याचा डाव रचला. आणि थेट स्वत:च्या घरात नेऊन ठेवला. 

यानंतर तो मालकाच्या दुकानावर गेला आणि तेथे रडू लागला. सिडको बसस्थानक येथून मध्यवर्ती बसस्थानकाकडे रिक्षातून जात असताना सहप्रवाशी म्हणून बसलेल्या दोन जणांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोख रक मेची बॅग हिसकावून नेली. यावेळी त्याला जीवे मारण्याची धमकी देत रिक्षातून उतरून दिल्याचे त्याने मालकाला सांगितले. त्याची ही कहाणी ऐकल्यानंतर अशाप्रकारे लुटमारीच्या घटना शहरात होतच असतात. यामुळे त्यांनी याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे ठरविले. या घटनेची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना मिळाली. 

पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ.दिपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात,पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी नितीन मोरे, मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, शेख हकीम,संजय खोसरे, संतोष सुर्यवंशी,अयुब पठाण, भाऊसिंग चव्हाण आणि फुंदे यांनी नोकर शेळके यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवून त्याची विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने काही दिवसापूर्वी फ्लॅट आणि प्लॉट पाहिला होता. फ्लॅट खरेदीसाठी त्याने लुटीचा बनाव केल्याची कबुली देत चोरलेला ऐवज काढून दिला.