शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

लॉकडाऊन काळात मद्यविक्री बंदीचा मोठा फटका; एक्साईजच्या उत्पन्नात ९६८ कोटी रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:43 IST

जूनपासून मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात आॅनलाईन मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली असली  तरी ग्राहकांकडून फारशी मागणी नाही

ठळक मुद्देएप्रिल ते जून महिन्यातील स्थिती गतवर्षी १ हजार २४१ कोटी रुपये मिळाले होते.

- बापू सोळुंके  

औरंगाबाद : लॉकडाऊन काळात हॉटेल बार, वाईन शॉप आणि मद्यनिर्मिती करणारे कारखाने बंद असल्याने त्याचा थेट फटका राज्य उत्पादन शुल्क विभागाला बसला. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क विभागाचे ९६८  कोटी रुपयांचे उत्पन्न घटले. 

औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीत देशी दारू तयार करणारे २ कारखाने, विदेशी मद्य निर्मितीचे ४ आणि   बीअर निर्मिती करणारे ६ कारखाने आहेत. या  कारखान्यांत तयार झालेले  मद्य बाजारात जाण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे  उत्पादन शुल्क जमा करणे कंपन्यांना बंधनकारक  असते. कर भरल्याशिवाय मद्याची एकही बाटली कारखान्याबाहेर जात नाही. यासाठी प्रत्येक कारखान्यात उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारी तैनात असतो.

येथील कारखान्यात तयार होणारे मद्य मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथे ६० टक्के  तर उर्वरित महाराष्ट्रमध्ये ४० टक्के पाठविले जाते.  मद्य विक्रीच्या करातून औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्याच्या तिजोरीत गतवर्षी ४ हजार ६१५ कोटी रुपये जमा झाले होते. विशेष म्हणजे दरवर्षी शासनाकडून महसूल वाढीचे उद्दिष्ट मिळते.यावर्षी आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या पहिल्या तिमाहीत कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण देशभर बाजारपेठ बंद होती.

जूनपासून मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात आॅनलाईन मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली असली  तरी ग्राहकांकडून फारशी मागणी नसल्याने त्याचा थेट आर्थिक फटका उत्पादन शुल्क विभागाला बसल्याचे समोर आले. एप्रिल ते जून या तिमाहीत गतवर्षी औरंगाबाद उत्पादन शुल्क विभागाला १ हजार २४१ कोटी रुपये मिळाले होते. तर यावर्षी उत्पन्नात ७८ टक्के घट होऊन केवळ २७३ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती अधीक्षक सुधाकर कदम यांनी दिली. ते म्हणाले की आपल्या  जिल्ह्यातील मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्या प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. आजही प्रमुख मेट्रो शहरातील मद्य विक्री आॅनलाईन आहे. थेट मद्य विक्री आणि बार सुरू झाल्यानंतर खप वाढेल आणि हळूहळू उत्पनात वाढ होईल. 

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागAurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक