शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

‘मैत्र मांदियाळी’ने शैक्षणिक पालकत्वाचा वसा घेत ४० विद्यार्थ्यांना केली उच्च शिक्षणाची दारे खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 16:24 IST

परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुला-मुलींसाठी या ग्रुपने उच्च शिक्षणाची दारे खुली करून दिली. 

ठळक मुद्दे शिक्षणासह वसतिगृहासाठीही केली मदतअनेकांच्या जीवनातील अंधकार केला दूर 

- गजानन दिवाण

औरंगाबाद : शाळाबाह्य मुलांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात; पण परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुला-मुलींचे काय? हाच विचार करून जालन्यातील ‘मैत्र मांदियाळी’ने  या मुला-मुलींचे पालकत्व  स्वीकारले. आतापर्यंत साधारण ४० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून या ग्रुपने उच्च शिक्षणाची दारे खुली करून दिली. 

गरीब-वंचित मुलांना आणि त्यांना सांभाळणाऱ्या संस्थांना मदत करणारा साधारण दीडशे जणांचा हा ग्रुप. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पदांवर काम करणारे हे सर्वजण. महिन्याला प्रत्येकी २०० रुपये जमा करतात. शिवाय विविध माध्यमांतून समाजातून महिन्याला साधारण सव्वा लाखाच्या आसपास रक्कम जमा होते. पालकत्व घेणारे वा अन्य मार्गाने मदत करणाऱ्यांची संख्या सात हजारांच्या घरात आहे. अमरावती जिल्ह्यात फासेपारधी मुलांची शाळा असलेल्या ‘प्रश्नचिन्ह’सह अनेक संस्थांना दर महिन्याला मदत करणाऱ्या मैत्र मांदियाळीने शैक्षणिक पालकत्वाचा वसा उचलला असल्याची माहिती अजय किंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्याची सुरुवात २०१७ ला झाली. वेगवेगळ्या कारणांनी शिक्षणापासून दुरावलेल्या किंवा दूर जातील अशा मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे काम या माध्यमातून केले जाते. 

शैक्षणिक पालकत्व ही त्यांना सहज सुचलेली कल्पना. मैत्र मांदियाळीचे सदस्य निवृत्ती रुद्राक्ष यांच्या दुकानात काम मागण्यासाठी एक मुलगा आला. आठवीत शिकत होता तो. वडील रोलिंग मिलमध्ये कामाला. बहिणीला दप्तर-वह्या घेता याव्यात म्हणून एक महिना तो काम करायचा. ‘आता तू काम करू नकोस. शाळा सुरू होण्याआधी ये. आम्ही तुला दप्तर-वह्या देऊ’, असे सांगून निवृत्ती यांनी त्याला परत पाठविले आणि सुरू झाली शैक्षणिक पालकत्वाची सफर. 

राज्य गुप्त वार्ता विभागात यशवंत इन्स्पेक्टर झालायशवंत, हा निलंगा (जि. लातूर) तालुक्यातील मुलगा. आई-वडील व एक लहान भाऊ. वडील व्यसनी. शेती नाही. पार्टटाईम जॉब करून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता; पण नोकरीमुळे अभ्यास होत नव्हता. दोन वर्षांपासून मेस, रूमभाड्यासाठी दरमहा चार हजार व इतर मदत केली जात आहे. तो काही महिन्यांपूर्वी राज्य गुप्त वार्ता विभागात इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त झाला आहे. जॉयनिंग लेटर येणे बाकी आहे. याचदरम्यान तो मंत्रालयीन सहायक पदाची परीक्षा पास झाला. एवढेच नव्हे, तर पीएसआयची पूर्व व मुख्य परीक्षादेखील पास झाला. 

अनेकांच्या जीवनातील अंधकार केला दूर - हरिओम, हा जालना जिल्ह्यातील मुलगा. काही वर्षांपूर्वी आजारी पडला व दवाखान्यात दाखल झाला. चुकीचे रक्त दिल्यामुळे ‘एड्स’ जडला. त्यामुळे वडिलांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि ते गाव सोडून भटकू लागले. मुलगा मामाकडे आला; पण मामाची परिस्थितीही बेताचीच. यावर्षी तो दहावीमध्ये जाईल. त्याला एका वसतिगृहात प्रवेश दिला व त्याचे १६ हजार रुपये शुल्क दोन टप्प्यांत जमा केले.

- अकोला तालुक्यातील ही मुलगी. वडील दिव्यांग. छोटी बहीण लग्न समारंभ व इतर ठिकाणी काम करायची व आई मजुरी; पण मागच्या वर्षी आईला अचानक अर्धांगवायू झाला. मुलगी हुशार. तिला नर्सिंगला जायचे होते. गावातील एका रिक्षावाल्याने मदत केली आणि वर्धा येथे तिचा नंबर लागला. तिच्या पहिल्या वर्षाची ६५ हजार रुपये फी व हॉस्टेल चे २० हजार रुपये भरले. इतर मासिक खर्चही ‘मैत्र मांदियाळी’तर्फे दिला जातो. 

- दीपक हा जालना तालुक्यातील मुलगा. ‘मैत्र’चे सदस्य रामेश्वर कौटकर यांच्या दुकानावर कामाला आला. एक भाऊ बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. घरी ४ एकर शेती. भावाच्या शिक्षणासाठी वडिलांनी काही शेती सावकाराकडे ठेवून व्याजाने पैसे घेतले. वडील सालदार आहेत. दोघांच्या शिक्षणाचा खर्च झेपणार नाही व भावाच्या शिक्षणाला मदत म्हणून मी काम करीत असल्याचे त्याने सांगितले. दहावीला त्याला ९१ टक्के होते. बारावीचा अर्ज भरला होता. त्याला परीक्षा देण्यासाठी तयार केले. ७६ टक्के मिळाले. नीटमध्ये १३१ गुण मिळाले. 

- बीफार्मसीला नंबर लागला. त्याचा भाऊही शिक्षण घेतो. दोघांच्याही शिक्षणाची जबाबदारी घेतली. वैभवचे प्रत्येक सेमिस्टरचे ३५ हजार रुपये आणि दीपकचे १५ हजार रुपये शुल्क, तसेच दोघांनाही मेस व रूम किराया म्हणून महिन्याला साडेपाच हजारांची मदत केली जाते. 

- वडील टोलनाक्यावर कामाला. डोळ्याने खूप कमी दिसायचे. आई शिवणकाम करून घराला हातभार लावते. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात बीएस्सीला प्रवेश मिळाला; पण प्रवेशासाठी पैसे नव्हते. तिचे दरवर्षीचे शुल्क ५५ हजार रुपये. तिला ३ वर्षे प्रवेशासाठी मदत केली. हे तिचे शेवटचे सेमिस्टर. 

- अनिलचे वडील भोळसर, आई केटरिंगमध्ये कामाला जाते. औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्सला नंबर लागला. पहिल्या वर्षाचे शुल्क कसेबसे भरले. यावर्षी त्याला ३३ हजारांची मदत केली.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक