‘मैत्रेय’ला टाळे!
By Admin | Updated: December 31, 2015 00:56 IST2015-12-31T00:54:45+5:302015-12-31T00:56:46+5:30
औरंगाबाद : अल्पावधीत जास्तीचा परतावा देण्याचे सांगून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या मैत्रेय या कंपनीच्या श्रेयनगर येथील कार्यालयाला बुधवारी अचानक टाळे लागले.

‘मैत्रेय’ला टाळे!
औरंगाबाद : अल्पावधीत जास्तीचा परतावा देण्याचे सांगून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या मैत्रेय या कंपनीच्या श्रेयनगर येथील कार्यालयाला बुधवारी अचानक टाळे लागले. आधीच कंपनीकडून मिळालेले परताव्याचे धनादेश अनादरित होत असल्याने हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये या प्रकाराने एकच खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच कंपनीच्या कार्यालयासमोर गुंतवणूकदार ठिय्या मांडून बसले होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला.
प्राप्त माहिती अशी की, मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चर प्रा. लि., आणि मैत्रेय रिलेटर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि., या वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांकडून गेल्या काही वर्षांपासून शहरातील हजारो गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमा गोळा केल्या जात आहेत. गुंतवलेल्या रकमेवर बारा टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून कंपनीकडून सामान्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या कंपनीच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. विशेषत: गोरगरीब, झोपडपट्टीत राहणारा छोटा गुंतवणूकदार, शेतकरी, मजूर कंपनीचे ग्राहक आहेत. एकरकमी अथवा दरमहा, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक असे पर्याय ग्राहकांना पैसे जमा करण्यासाठी कंपनीने दिलेले आहेत. शिवाय जास्तीत जास्त सहा वर्षे मुदत होती. राष्ट्रीय बँका, एलआयसी, पोस्ट आदी शासकीय कार्यालयांकडून मिळणारा परतावा साडेसहा ते सात टक्क्यांपर्यंत असल्याने गुंतवणूकदारांनी मैत्रेय कंपनीत मोठ्या रकमा गुंतविल्याचे
नित्याप्रमाणे काही गुंतवणूकदार बुधवारी सकाळीच कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा कार्यालयाला टाळे असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. अकरा वाजले तरी एकही कर्मचारी कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांची बेचैनी वाढली.
४मैत्रेयला टाळे लागल्याची वार्ता वाऱ्यासारखी सर्व गुंतवणूकदारांमध्ये पोहोचली आणि कार्यालयासमोर एकच गर्दी उसळली. कार्यालयास कुलूप असल्याचे पाहून आता आपले पैसे बुडाले, असे म्हणत शेकडो गुंतवणूकदार आणि कंपनीच्या एजंटस्नी दिवसभर कार्यालयासमोर ठिय्या दिला. काही गुंतवणूकदारांनी उस्मानपुरा ठाण्यात धाव घेतली. कार्यालयाची तोडफोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त नेमला.