अजिंठ्याला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:04 IST2021-04-22T04:04:31+5:302021-04-22T04:04:31+5:30
अजिंठा : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी रात्री फुटल्याने अजिंठ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...

अजिंठ्याला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटली
अजिंठा : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी रात्री फुटल्याने अजिंठ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत पाइपलाइन जोडणीचे काम बुधवारी रात्रीपर्यंत सुरू होते.
अजिंठा-बुलडाणा महामार्गाचे काम सुरू असताना ही पाइपलाइन रस्त्याच्या बाजूने नवीन करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, ठेकेदाराने केवळ रस्ता क्राॅस करून दिल्याने जड वाहने गेल्यास ही जुनी पाइपलाइन जागोजागी फुटत आहे. काही ठिकाणी ही पाइपलाइन रस्त्याच्या खाली दबली गेली आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला आहे. रस्त्यावरून जड वाहने गेल्यानंतर रस्त्याखाली दबलेली पाइपलाइन फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. मंगळवारी रात्री पाइपलाइन फुटल्यानंतर ग्रामपंचायतीकडून ती जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. गुरुवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सरपंच नजीर अहेमद यांनी दिली.
नवीन पाइपलाइन करून देण्याची मागणी
अजिंठा येथे काही वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेतून नवीन पाइपलाइन करण्यात आली होती. मात्र, ही पाइपलाइन अजिंठा-बुलडाणा रस्त्याच्या कडेला आल्याने काम सुरू असताना अनेकवेळा फुटली. यामुळे अजिंठा-अंधारी प्रकल्पापासून ते अजिंठा बसस्थानकापर्यंत पूर्ण खराब झालेली पाइपलाइन ठेकेदाराने नवीन करून द्यावी, अशी मागणी होत आहे. पाइपलाइन फुटली तर नवीन रस्ता कसा खोदणार असा जटिल प्रश्न आता समोर आला आहे. चौपदरी रस्ता गृहीत धरून अगोदरच नियोजनाने ही पाइपलाइन केली असती, तर आज पैशांचा चुराडा झाला नसता, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
फोटो कॅप्शन
: अजिंठा-बुलडाणा रस्त्यावर अजिंठा गावाला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटली. त्याची पाहणी करताना ठेकेदार व ग्रामपंचायत कर्मचारी दिसत आहेत.
210421\img-20210421-wa0380_1.jpg
अजिंठा-बुलढाणा रस्त्यावर अजिंठा गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली. त्याची पाहणी करताना ठेकेदार व ग्रामपंचायत कर्मचारी दिसत आहे.