मेहुण्यानेच मेहुण्याला लुटले !
By Admin | Updated: February 13, 2015 00:50 IST2015-02-13T00:44:34+5:302015-02-13T00:50:07+5:30
लातूर : मेहुण्यासोबत प्लॉट खरेदीखत करण्यासाठी आलेल्या मेहुण्याने मित्रांच्या मदतीने ५ लाखांना लुटले. भ्रमणध्वनीवर मित्रांशी संवाद करून ठावठिकाणा कळविला.

मेहुण्यानेच मेहुण्याला लुटले !
लातूर : मेहुण्यासोबत प्लॉट खरेदीखत करण्यासाठी आलेल्या मेहुण्याने मित्रांच्या मदतीने ५ लाखांना लुटले. भ्रमणध्वनीवर मित्रांशी संवाद करून ठावठिकाणा कळविला. मित्रांनीही दुचाकीवरून पाठलाग करून वाटेत गाठले आणि ५ लाखांना लुटले़ बायकोच्या मामेभावाने पोलिसी खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली़
६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील अन्वर इसाक खान, मुलगा निजामोद्दीन खान व मामाचा मुलगा मोईज चाऊस हे तिघे जण लातूरहून आॅटोमध्ये बसून औशाला प्लॉट खरेदी करण्यासाठी निघाले होते. त्यांच्या आॅटोला चांडेश्वर गावानजिक अडविले. ‘तुम्ही सलीम जावेदला मारून आलात’ असा कांगावा करून फिर्यादी अन्वर खान यांच्या मेहुण्यानेच ५ जणांच्या सहकार्याने दुचाकीवर त्या आॅटोचा पाठलाग करुन आॅटोतील तिघांना चांडेश्वरनजिक मारहाण करून त्यांच्या जवळील पाच लाख रूपयाची बॅग जबरीने काढून घेवून पोबारा केला होता.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणातील मोईज जब्बार चाऊस, ओवेज हुकुमत पठाण (१९), अमिर जब्बार शेख (वय २२, रा़बरकत नगर) या तिघांना सापळा रचून बसवेश्वर महाविद्यालयाजवळून ताब्यात घेतले. तर या प्रकरणातील अन्य निजाम तांबोळी, रहिम तांबोळी व अल्ताफ शेख (रा़ हमाल गल्ली, लातूर) या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा येथून ताब्यात घेतले. या आरोपींना लातूर न्यायालयासमोर हजर करताच न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)
चांडेश्वरनजिक ५ लाखाची लूट करणाऱ्या सहाही आरोपींकडून ४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, आरोपीकडील दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत़